झोमॅटोने कमावला 175 कोटीचा नफा

झोमॅटोने कमावला 175 कोटीचा नफा

मुंबई :
ऑनलाईन फूड डिलीव्हरी झोमॅटो कंपनीने आपल्या चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला असून कंपनीने 175 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला असल्याचे दिसून आले आहे. जानेवारी ते मार्च या चौथ्या तिमाहीत कंपनीने वरील कामगिरी प्राप्त केली आहे. मागच्या वर्षी समान तिमाहीमध्ये कंपनीने 188 कोटी रुपयांचा तोटा सहन केला होता. डिसेंबर 2023 ला संपलेल्या तिमाहीत 136 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. याच दरम्यान कंपनीचे समभाग इंट्राडे दरम्यान शेअर बाजारात 207 रुपयांवर विक्रमी स्तरावर पोहोचले होते. कंपनीने याच तिमाहीमध्ये 3562 कोटी  रुपयांचा महसूल प्राप्त केला आहे. मार्च तिमाहीमध्ये 389 कोटी रुपयांचा खर्च केला असल्याचेही सांगितले जात आहे.