#LatestNews #MarathiNews #Politics : भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर ! : Bharat Live News Media

उमरगा प्रतिनिधी उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांनी जाहीर केली.यामध्ये प्रामुख्याने युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी उमेश स्वामी यांची, तर महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी जयश्री कलशेट्टी व ओबीसी आघाडी श्रीराम राठोड उमरगा शहराध्यक्ष हंसराज गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नूतन कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी अभय […]

भाजपची उमरगा तालुका कार्यकारिणी अखेर जाहीर !

उमरगा प्रतिनिधी
उमरगा तालुका भारतीय जनता पार्टीची नूतन कार्यकारिणी व विविध आघाड्यांच्या अध्यक्षांची निवड शनिवारी (दि. २३) तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांनी जाहीर केली.यामध्ये प्रामुख्याने युवा मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी उमेश स्वामी यांची, तर महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी जयश्री कलशेट्टी व ओबीसी आघाडी श्रीराम राठोड उमरगा शहराध्यक्ष हंसराज गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नूतन कार्यकारणी मध्ये उपाध्यक्षपदी अभय माने, किशोर सांगवे, शरद पवार, ब्रह्मानंद ओमशेट्टी, लोकेश बिराजदार, गणेश माने, दिलीप सुरवसे, सुशील जाधव, धर्मा सोनवणे. सरचिटणीस पदी सागर पाटील, विठ्ठल चिकुंद्रे, माधव सलके यांची निवड करण्यात आली.यावेळी उमरगा शहराच्या शहराध्यक्ष पदी हंसराज गायकवाड, तर मुरूम शहराध्यक्षपदी गुलाब डोंगरे, कोषाध्यक्षपदी पंडित शिंदे सरचिटणीस साठी अनिता जाधव, अनिल माने, अरविंद फुगटे, मल्लिकार्जुन साखरे, गोविंद बोकले, अजित राजोळे, बालाजी माणिकवार. प्रसिद्धीप्रमुख अरुण इगवे, युवा मोर्चा अध्यक्षपदी उमेश स्वामी, उपाध्यक्षपदी नितेश जाधव, सरचिटणीस महेश पाटील, प्रवीण सोमवंशी. ओबीसी आघाडी श्रीराम राठोड, एस सी मोर्चा अनुसूचित जाती राम कांबळे. महिला मोर्चा अध्यक्षपदी जयश्री कलशेट्टी तर उपाध्यक्षपदी गीताश्री पाटील, सरचिटणीस मंदाकिनी चव्हाण. अल्पसंख्याक आघाडी अध्यक्षपदी रियाज शेख, सरचिटणीस जमाल मुजावर. किसान मोर्चा किसान पाटील, सहकार आघाडी सिद्राम जाधव, सोशल मीडिया विवेकानंद हंगरगे, स्वस्तिक कलशेट्टी आप्पा शेटगार. विधी आघाडी मानव जाधव यांची निवड करण्यात आली.
सर्व गटातील घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न

कार्यकारिणीमध्ये प्रामुख्याने तालुक्‍यातील सर्व गटातील घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सर्व ग्रामीण व शहरी भागातील पक्षाच्या निष्ठावंत व क्रियाशील कार्यकर्त्यांना तसेच नवीन कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली असल्याचे तालुकाध्यक्ष शहाजी पाटील यांनी सांगितले.