राहूल गांधी यांच्याबरोबर चर्चेसाठी भाजपकडून अभिनव प्रकाश यांचे नाव जाहिर

राहूल गांधी यांच्याबरोबर चर्चेसाठी भाजपकडून अभिनव प्रकाश यांचे नाव जाहिर

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबरोबर जाहीर चर्चेचे आमंत्रण स्वीकारून भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष तेजस्वी सूर्या यांनी BJYM चे उपाध्यक्ष अभिनव प्रकाश यांना नामनिर्देशित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांना निवृत्त न्यायमूर्ती मदन बी. लोकूर, न्यायमूर्ती अजित पी. शहा आणि पत्रकार एन. राम यांनी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जाहीर वादविवादाचे आमंत्रण दिले होते. राहूल गांधी यांनी हे आवाहन स्विकारून चर्चेसाठी तयारी दर्शवली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कोणते उत्तर येते याची उत्सुकता लागली होती.
आज अभिनव प्रकाश यांच्या नावाची घोषणा करताना तेजस्वी सूर्या यांनी पासी अभिनव प्रकाश हे पासी या दलित जातीचे प्रतिनिधीत्व करतात असाही उल्लेख केला. तसेच ते रायबरेलीचे रहिवाशी असून तिथूनच राहूल गांधी लोकसभेची निवडणुक लढवत आहेत.
अभिनव प्रकाश यांची ओळख पटवून देताना खासदार तेजस्वी सुर्या यांनी एका निवेदनामध्ये म्हटले आहे की, “अभिनव प्रकाश हे केवळ भाजपच्या युवा शाखेतील प्रतिष्ठित नेते नाहीत तर आमच्या सरकारने राबवलेल्या धोरणांचे आणि सुधारणांचे ते प्रवक्ते आहेत. तसेच ते जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयु) विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि दिल्ली युनिव्हर्सिटीच्या रामजस कॉलेजमधील अर्थशास्त्राचे सहाय्यक प्राध्यापकसुदधा आहेत.”अशी ओळख त्यांनी करून दिली.
ते काय पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत काय ?
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेचे आमंत्रण स्वीकारल्यानंतर यावर लगेच प्रतिक्रिया देताना तेजस्वी सूर्या म्हणाले की “पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी चर्चा करावी असे राहुल गांधी कोण आहेत ? राहुल गांधी हे काँग्रेस पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवारही नाहीत, तर INDI आघाडी सोडा त्यांनी आधी स्वत:ला काँग्रेसचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित करावे.” असे म्हटले आहे.