आंध्रप्रदेशात कर्नूलमध्ये टीडीपी नेत्याची हत्या

वृत्तसंस्था/ हैदराबाद आंध्रप्रदेशमध्ये टीडीपी नेते गौरीनाथ चौधरी यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. कुर्नूल जिह्यातील बोमीरे•ाrपल्ले गावात त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून संपूर्ण परिसरात मोठा सुरक्षा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेस या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप करण्यात आला […]

आंध्रप्रदेशात कर्नूलमध्ये टीडीपी नेत्याची हत्या

वृत्तसंस्था/ हैदराबाद
आंध्रप्रदेशमध्ये टीडीपी नेते गौरीनाथ चौधरी यांच्या हत्येचे प्रकरण समोर आले आहे. या जीवघेण्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. कुर्नूल जिह्यातील बोमीरे•ाrपल्ले गावात त्यांची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण असून संपूर्ण परिसरात मोठा सुरक्षा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. वायएसआर काँग्रेस या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे. या हत्येचे प्रकरण संवेदनशील असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.