लामिछने नेपाळ संघात लवकरच दाखल होणार

लामिछने नेपाळ संघात लवकरच दाखल होणार

वृत्तसंस्था/ किंग्जटाऊन (सेंट व्हिन्सेंट)
सध्या अमेरिका आणि विंडीज यांच्या संयुक्त यजमानपदाने आयसीसीची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या नेपाळ संघातील अव्वल क्रिकेटपटू संदीप लामिछने हा विंडीजमधील होणाऱ्या लीग टप्प्यातील शेवटच्या दोन सामन्यांत खेळणार आहे.
नेपाळचा अव्वल क्रिकेटपटू संदीप लामिछने याच्यावर बलात्काराचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी त्याला 8 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावण्यात आल्याने अमेरिकेने व्हिसा दोन वेळा यापूर्वी नाकारला होता. संदीपने या प्रकरणी वरच्या कोर्टात दाद मागीतली होमी. दरम्यान वरील न्यायालयाने  पुरेशा पुराव्यांअभावी तो निर्दोष असल्याचा निकाल दिला आहे. नेपाळच्या 15 जणांच्या संघामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. आता या स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील नेपाळचे शेवटचे दोन सामने विंडीजमध्ये खेळविले जाणार असून या सामन्यावेळी संदीप लामिछने दाखल होणार असल्याचे नेपाळ क्रिकेट संघटनेच्या प्रवक्त्याने सांगितले.