सुमित नागल दुसऱ्या फेरीत

सुमित नागल दुसऱ्या फेरीत

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताचा अव्वल टेनिसपटू सुमित नागलने मोरोक्कोतील माराकेश ओपन 250 एटीपी टेनिस स्पर्धेत आश्वासक सुरुवात करताना रोमांचक विजय मिळवून दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. जागतिक क्रमवारीत 95 व्या स्थानावर असणाऱ्या नागलने फ्रान्सच्या कोरेन्टिन मुटेटवर एक सेटची पिछाडी भरून काढत 4-6, 6-3, 6-2 अशी मात केली. गेल्या वर्षी हेलसिंकी येथे झालेल्या चॅलेंजर स्पर्धेच्या अंतिम फेरीत नागलला याच प्रतिस्पर्ध्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्याची पुढील लढत चौथ्या मानांकित इटलीच्या लॉरेन्झो सोनेगोशी होईल. या वर्षी झालेल्या दुबई चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पहिल्या फेरीत नागलची सोनेगोशी गाठ पडली होती आणि त्यावेळी सोनेगोने विजय मिळविला होता.