‘ज्ञानवापी’ सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्‍याची धमकी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : वाराणसीमधील बहुचर्चित ज्ञानवापी मशीद संकुलाच्या व्हिडिओग्राफिक सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून आलेल्‍या फोनवर या धमक्‍या मिळाल्‍याची तक्रार त्‍यांनी पोलिसांकडे केली आहे. बरेली पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात न्यायमूर्ती दिवाकर यांनी म्‍हटलं आहे की, “१५ एप्रिल रोजी एका …
‘ज्ञानवापी’ सर्वेक्षणाचे आदेश देणाऱ्या न्यायमूर्तींना जीवे मारण्‍याची धमकी


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : वाराणसीमधील बहुचर्चित ज्ञानवापी मशीद संकुलाच्या व्हिडिओग्राफिक सर्वेक्षणाचे आदेश दिल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेले अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवी कुमार दिवाकर यांनी जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रमांकांवरून आलेल्‍या फोनवर या धमक्‍या मिळाल्‍याची तक्रार त्‍यांनी पोलिसांकडे केली आहे.
बरेली पोलीस अधीक्षकांना लिहिलेल्या पत्रात न्यायमूर्ती दिवाकर यांनी म्‍हटलं आहे की, “१५ एप्रिल रोजी एका आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून कॉल आला. यावेळी बोलणार्‍याने जीवे मारण्याची धमकी दिली. काही दिवसांनी पुन्‍हा एकदा असाच एक फोन आला.
न्यायमूर्ती दिवाकर ज्यांची नुकतीच बरेली येथे बदली झाली आहे. यापूर्वी त्‍यांनी आपल्याला आणि त्यांच्या कुटुंबीयांना धमक्या आल्याचे म्‍हटले होते. तसेच त्‍यांनी या प्रकरणाच्‍या चौकशीची मागणीही केली होती. बरेली येथे बदली झाल्यानंतर, न्यायमूर्ती दिवाकर यांनी 2018 च्या बरेली दंगलीप्रकरणी स्वतःहून कारवाई सुरू केली. 2018 च्या बरेली दंगलीतील कथित सूत्रधार असल्याबद्दल त्याने मौलाना तौकीर रझाला खटल्याला सामोरे जाण्याचे आदेश दिले होते.या दंगलीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेची नासधूस झाली होती. तसेच बरेलीमध्ये 27 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली होती.
न्यायमूर्ती दिवाकर यांनी एप्रिल 2022 मध्ये काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ज्ञानवापी मशिदीचे व्हिडिओ सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. यानंतर त्यांना धमक्या येऊ लागल्या. त्यांनी वुझू खाना (अवचन क्षेत्र) सील करण्याचे आदेशही दिले होते. धमक्या मिळत असल्‍याने त्‍यांच्‍यासह त्यांच्या कुटुंबाना Y-श्रेणी सुरक्षा पुरविण्‍यात आलीहोती. मात्र, नंतर ते एक्स श्रेणीत कमी करण्यात आले. न्यायाधीशांच्या सध्याच्या सुरक्षेच्या तपशीलामध्ये दोन सुरक्षा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

Go to Source