भाजपमध्ये प्रवेश करताच अरविंदर सिंह लवली यांना मोठी जबाबदारी

भाजपमध्ये प्रवेश करताच अरविंदर सिंह लवली यांना मोठी जबाबदारी

प्रथमेश तेलंग

नवी दिल्ली, Bharat Live News Media वृत्तसेवा : दिल्ली लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या स्टार प्रचारकांमध्ये अरविंदर सिंह लवली यांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपने दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची स्टार प्रचारकांची यादी सोमवारी (दि.६) जाहीर केली. या यादीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष जे. पी. नड्डा, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह ४० जणांची नावे आहेत. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातील हे नेते दिल्लीत भाजपचे स्टार प्रचारक असतील.
राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली आहे. यासाठी भाजपने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत पक्षामध्ये दोन दिवसांपूर्वीच प्रवेश केलेले अरविंदर सिंह लवली यांचे नाव समाविष्ट आहे. अरविंदर सिंह लवली यांनी दिल्ली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांची वर्णी स्टार प्रचारकांच्या यादीत लागली आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे दिल्लीत नेतृत्व करणारे अरविंदर सिंह लवली आता विरोधात प्रचार करणार आहेत.
दिल्लीतील भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा यांचाही समावेश आहे. दिल्लीतील ७ लोकसभा जागांवर २५ मे रोजी मतदान होणार आहे.
हेही वाचा : 

अरविंद केजरीवालांची राष्ट्रीय तपास संस्थेद्वारे चौकशी करा : नायब राज्यपाल
P. Chidambaram : काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका करणाऱ्या भाजप नेत्यांनी डोळ्यावर उपचार करावेत: पी. चिदंबरम
Girish Mahajan | आमच्या सोबत असताना सगळं गोड लागलं आणि आता.. गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

Latest Marathi News भाजपमध्ये प्रवेश करताच अरविंदर सिंह लवली यांना मोठी जबाबदारी Brought to You By : Bharat Live News Media.