धर्मवीर चित्रपटाचे खरे दिग्दर्शक तुम्हीच, मग चित्रपट खोटा कसा ? : राजन विचारे

धर्मवीर चित्रपटाचे खरे दिग्दर्शक तुम्हीच, मग चित्रपट खोटा कसा ? : राजन विचारे

ठाणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : धर्मवीर सिनेमात जे काही दाखवले, राजन विचारे स्वत:हून आले, त्यांनी सभागृह पद दिले, हे सर्व खोटे आहे. दुसऱ्या पार्टमध्ये सिनेमात जे काय आहे, ते खरं दाखवणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारे यांच्यावर महायुतीच्या मेळाव्यात गंभीर आरोप केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या आरोपांना राजन विचारे यांनीही प्रत्युत्तर दिले आहे. धर्मवीर चित्रपटाचे खरे दिग्दर्शक तुम्हीच मग चित्रपट खोटा कसा ? असा टोला विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. Rajan Vichare on Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २०१३ मध्ये पाच आमदारांना घेऊन काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, वारंवार त्यांनी बंड करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शेवटच्या बंडापर्यंत मी त्यांच्या सोबत होतो. मात्र, त्यांना केवळ शिवसेना संपवायची होती, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आम्ही सिनेमा काढला म्हणता, मात्र आम्ही आमच्या पैशाने तिकीटे काढून सिनेमा दाखवला. तुम्ही कुठे खर्च केला. कार्यकर्त्यांनी खर्च केला असून खोटे सिनेमा काढता, म्हणजे दिघे यांच्यावर त्यांचे किती प्रेम होते, हे यातून दिसत आहे, असेही ते म्हणाले. शिंदे यांना पहिले आमदारकीचे तिकीट मीच मिळवून दिले, असा दावा करून दोन वर्षांत विकास कामे काय केली, ठाण्यासाठी काय काय केले, त्याची उत्तरे आधी द्या, असा सवालही त्यांनी शिंदे यांना केला. Rajan Vichare on Eknath Shinde
नरेश म्हस्के कोरोना काळात कुठे होता, घरात बसून होता, महापौर पदाच्या कारर्किदीत काय काम केले, हे सांगावे, केवळ गोल्डन गँगचा लिडर म्हणूनच त्याची ओळख होती. ठाणे महापालिका लुटण्याचे काम म्हस्के याने केले आहे. टेंभी नाक्याच्या देवीसमोर लागणारे बॅनर काढून त्याठिकाणी शिंदे यांनी स्वत:चे बॅनर लावले. आनंद दिघे यांच्या आनंद आश्रमाची पाटी काढून तेथे स्वत:च्या नावाची पाटी लावली, त्यामुळे दिघे यांच्यावरील प्रेम काय होते, हे मला बोलायला लावू नका, असा इशाराही त्यांनी दिला. तुम्हाला शिवसेना संपवायची होती. राजन विचारे तुमच्या मागे होता. म्हणून तुम्हाला आमदारकीचे तिकीट मिळाले, असा दावाही विचारे यांनी केला.
हेही वाचा 

उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंची मालमत्ता विचारली: एकनाथ शिंदे
Lok Sabha Election Eknath Shinde : काँग्रेसने शहिदांचा केलेला अपमान नकली हिंदुत्ववाद्यांना मान्य आहे का ?: एकनाथ शिंदे
Girish Mahajan | आमच्या सोबत असताना सगळं गोड लागलं आणि आता.. गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना सुनावलं

Latest Marathi News धर्मवीर चित्रपटाचे खरे दिग्दर्शक तुम्हीच, मग चित्रपट खोटा कसा ? : राजन विचारे Brought to You By : Bharat Live News Media.