धुळे लोकसभेच्या निवडणुकीतून चौघांची माघार, किती उरले रिंगणात?

धुळे लोकसभेच्या निवडणुकीतून चौघांची माघार, किती उरले रिंगणात?

धुळे : Bharat Live News Media वृत्तसेवा धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीच्या रिंगणातून चौघांनी माघार घेतली. त्यामुळे आता 18 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. धुळे लोकसभा मतदारसंघात आज माघारी अंतिम लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात 18 उमेदवार असले तरीही भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यात प्रमुख लढत होण्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. (Lok Sabha Election 2024)
धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीची अधिसुचना 26 एप्रिल, 2024 रोजी प्रसिध्द झाली होती. त्यानुसार धुळे लोकसभा मतदार संघासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटचा दिवस 3 मे, 2024 पर्यंत 30 उमेदवारांनी 42 नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. नामनिर्देशपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी 4 मे रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत 22 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध तर 8 उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. आज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने आज दुपारी 4 उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आता धुळे लोकसभा मतदार संघ निवडणूकीसाठी 18 उमेदवार रिंगणात राहणार आहे. धुळे लोकसभा मतदार संघासाठी येत्या 20 मे रोजी सकाळी 7.00 ते सांयकाळी 6.00 या वेळेत मतदान होणार असून 4 जून, 2024 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून शासकीय धान्य गोडावून येथे मतमोजणी होणार असल्याचेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी गोयल यांनी सांगितले. दरम्यान धुळे लोकसभा मतदारसंघात 18 उमेदवार रिंगणात असले तरी भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर सुभाष भामरे आणि राष्ट्रीय काँग्रेसच्या डॉक्टर शोभा बच्छाव यांच्यात सरळ सरळ लढत होण्याची चित्र आज स्पष्ट झाले आहे. (Lok Sabha Election 2024)
रिंगणातील उमेदवार, पक्ष व चिन्ह यादी (Lok Sabha Election 2024)
जहूर अहमद मोहम्मद युसुफ – बहुजन समाज पार्टी-हत्ती, बच्छाव शोभा दिनेश-इंडियन नॅशनल कॉग्रेस-हात, भामरे सुभाष रामराव- भारतीय जनता पार्टी- कमळ, नामदेव रोहिदास येळवे- भारतीय जवान किसान पार्टी- भेटवस्तू, पाटील शिवाजी नाथू- ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक- सिंह,मुकिम मिना नगरी-भीम सेना-ॲटो रिक्षा, शेख मोहम्मद जैद शमीम अहमद-वेल्फेअर पार्टी ऑफ इंडिया-गॅस सिलेंडर, अब्दुल हफीज अब्दुल हक-अपक्ष-बॅट, इरफान मो इसहाक-अपक्ष-नारळाची बाग,भरत बाबुराव जाधव-अपक्ष-बॅटरी टॉर्च, मलय प्रकाश पाटील-अपक्ष-फणस, मोहम्मद आमिन मोहम्मद फारुख-अपक्ष-फलंदाज, मोहम्मद इस्माईल जुम्मन-अपक्ष-कपाट, राज चव्हाण-अपक्ष- प्रेशर कुकर,शफीक अहमद मोहम्मद रफीक शेख-अपक्ष-हिरा,ॲङ सचिन उमाजी निकम-अपक्ष- शिट्टी,सुरेश जगन्नाथ ब्राम्हणकर- अपक्ष-गॅस शेगडी, संजय रामेश्वर शर्मा- अपक्ष- फुगा
हेही वाचा

Congress on PM Modi : चीनच्या घुसखोरीवरून काँग्रेसचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
Lok Sabha Election 2024 | शांतिगिरी महाराजांच्या माघारीचे प्रयत्न अयशस्वी, अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात कायम

Latest Marathi News धुळे लोकसभेच्या निवडणुकीतून चौघांची माघार, किती उरले रिंगणात? Brought to You By : Bharat Live News Media.