Weather Report : राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा..!

Weather Report : राज्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाचा इशारा..!

पुणे : राज्यात उष्णतेच्या लाटेबरोबरच अवकाळी पाऊस हजेरी लावीत असून, पुढील तीन दिवस म्हणजेच 26 एप्रिलपर्यंत मध्यमहाराष्ट्र, कोकण, मराठवाडा तसेच विदर्भात अवकाळी पाऊस, वादळी वारे, मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडाटासह बरसणार आहे. दरम्यान, राज्यात बुधवारी सर्वात अधिक 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मालेगाव येथे झाली. मध्यमहाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरात चक्रिय स्थिती सक्रिय आहे.
मध्यमहाराष्ट्रापासून केरळपर्यंत कार्यरत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांची तीव्रता पूर्णपणे कमी झाली आहे. मात्र मध्यमहाराष्ट्रावर सक्रिय असलेल्या चक्रिय स्थितीमुळे राज्यात अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्यामुळे कमाल तापमानदेखील मागील काही दिवसांपासून 40 अंश सेल्सिअसच्या आसपास रेंगाळले आहे. असे असले तरी उष्णतेचा तडाखा कायम असून, रात्रीच्या उकाड्यात तेवढीच वाढ झालेली.
हेही वाचा 

राहुल गांधींनी सत्तेचे स्वप्न पाहू नये; अमित शहांचा टोला
कोल्हापूर : निम्म्या शहरात आजपासून दोन दिवस पाणीबाणी
निवडणुकांवर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही : सुप्रीम कोर्ट