पुणेकरांनो छत्री, रेनकोट घेऊन घराबाहेर पडा! पावसाचा मुक्काम वाढला..!

पुणेकरांनो छत्री, रेनकोट घेऊन घराबाहेर पडा! पावसाचा मुक्काम वाढला..!

पुणे : Bharat Live News Media वृत्तसेवा : शहरात मे महिन्यातील पावसाने गेल्या दहा वर्षांतील दुसर्‍या क्रमांकाचा उच्चांक स्थापित केला आहे. 15 मे 2012 रोजी 102 मि. मी. पाऊस झाला. हा पाऊस मे महिन्यातील आजवरचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. तर 11 मे 2024 रोजी 40.4 मि. मी. इतका पाऊस झाला आहे. शहरात मार्च व एप्रिलमध्ये पाऊस झालाच नाही. मे महिन्यात शहरात 3.5 ते 20 मि. मी. इतका सरासरी पाऊस झाला आहे. मे महिन्यातील आजवरचा उच्चांकी पाऊस 12 मे 2015 रोजी 102 मि.मी. इतका पाऊस झाला होता. त्यानंतर नऊ वर्षांनंतर 11 मे 2024 रोजी शहरात 40.4 मि.मी. इतका दुसरा विक्रमी पाऊस ठरला.
आजपासून छत्री, रेनकोट घेऊन घराबाहेर पडा
शहरात 10 व 11 मे रोजी जोरदार पाऊस झाला.10 रोजी शिवाजीनगरमध्ये 28 मि. मी., तर 11 मे रोजी 40.4 मि. मी. पाऊस झाला. रविवारी पावसाने विश्रांती घेतली. तरी काही भागात 1 मि. मी. पावसाची नोंद झाली. सोमवारी 13 मे रोजी शहरात दुपारनंतर पावसाचा अंदाज आहे. तसेच 18 मेपर्यंत शहराच्या भोवती बाष्पयुक्त ढगांची गर्दी राहणार असून, विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज दिला आहे.
हेही वाचा

अवघ्या 10 ते 50 पैशांत होणार हिमोग्लोबिनची चाचणी
धुळे-नंदुरबार लोकसभेसाठी शिरपूर आणि साक्री मधून मतदानास सुरुवात
लोकसभेची रणधुमाळी : चौथ्या टप्प्यातील मतदानास सुरवात, जळगाव मध्ये जिल्हाधिकारी यांनी बजावला मतदानाचा हक्क