टीकेचा आसूड ओढत गौरव वल्‍लभ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; म्‍हणाले, ‘सनातनाविरोधी….’

टीकेचा आसूड ओढत गौरव वल्‍लभ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; म्‍हणाले, ‘सनातनाविरोधी….’

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : “आज काँग्रेस पक्षाची दिशाहीन वाटचाल सुरु आहे. मी सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही. देशात संपत्ती निर्माण करणाऱ्यांबाबत चांगला बोलताही येत नाही, “अशी खंत व्‍यक्‍त करत मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, अशी घोषणा काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते गौरव वल्लभ यांनी गुरुवारी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. यानंतर X वर काँग्रेस अध्‍यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना दोन पानांचे राजीनामा पत्र पोस्ट करत पक्षाच्‍या धोरणांवर टीका करत प्रश्‍नांची सरबत्तीही केली आहे.
काँग्रेस पक्षाची सध्‍या दिशाहीन वाटचाल
आपल्‍या पत्रात गौरव वल्लभ यांनी म्‍हटले आहे की, काँग्रेस पक्षाची सध्‍या दिशाहीन वाटचाल सुरु आहे. त्‍यामुळे मी पक्ष सोडत आहे. आज मी सनातनविरोधी घोषणा देऊ शकत नाही. देशाच्या संपत्तीचा गैरवापर करणार्‍यांविरोधात बोलू शकत नाही. त्‍यामुळे मी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदांचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. “वल्लभ म्हणाला.
संपूर्ण हिंदू समाजाचा पक्षाला विरोध होताना दिसत आहे
एकीकडे आपण जातीनिहाय जनगणनेबद्दल बोलतो आणि दुसरीकडे संपूर्ण हिंदू समाजाचा पक्षाला विरोध होताना दिसत आहे. या कार्यशैलीमुळे समाजाला दिशाभूल करणारा संदेश मिळतो. हा पक्ष एका विशिष्ट धर्माचा समर्थक आहे, हे काँग्रेसच्या मूलभूत तत्त्वांच्या विरोधात आहे, असेही त्‍यांनी पत्रात स्‍पष्‍ट केले आहे.
आपल्या देशात व्यवसाय करून पैसे कमविणे चुकीचे आहे का?”
आर्थिक बाबींवर काँग्रेसची भूमिका देशातील संपत्ती निर्माण करणाऱ्यांचा नेहमीच अपमान आणि गैरवापर करण्याची राहिली आहे. आज उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण (LPG) धोरणांच्या विरोधात गेलो आहोत. ज्यांच्या अंमलबजावणीचे संपूर्ण श्रेय जगाने आम्हाला दिले आहे. आपल्या देशात व्यवसाय करून पैसे कमविणे चुकीचे आहे का?”, असा सवालही त्‍यांनी केला आहे.
माझा आर्थिक क्षमता देशाच्या हितासाठी वापरावे. यासाठी मी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. पक्षाचे आर्थिक धोरण राष्ट्रीय स्तरावर मांडू शकलो असतो. मात्र पक्षाचा जाहीरनामा असो की धोरण यामध्‍ये याचा उपयोग झाला नाही. माझ्यासारख्या आर्थिक विषयांची जाण असलेल्या व्यक्तीसाठी श्वास कोंडण्यापेक्षा कमी नाही,” असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

“Can’t raise anti-Sanatana slogans”: Congress leader Gourav Vallabh resigns from party
Read @ANI Story | https://t.co/ScF8PnEgae#GouravVallabh #Congress #LokSabhaElections2024 pic.twitter.com/qXL1avbWoR
— ANI Digital (@ani_digital) April 4, 2024

कोण आहेत गौरव वल्लभ?
गौरव वल्लभ जोधपूर जिल्ह्यातील पिपर गावचा रहिवासी आहेत. पीएचडी पूर्ण केल्‍यानंतर ते जमशेदपूरच्या XLRI कॉलेजमध्ये प्राध्यापक पदी नियुक्‍त झाले. काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. ते पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जमशेदपूर पूर्व मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. यानंतर 2023 मध्ये उदयपूर मतदारसंघातून राजस्थान विधानसभा निवडणूक लढवली होती.
हेही वाचा : 

Sanjay Nirupam : काँग्रेसमधून हकालपट्टी होण्‍यापूर्वीच मी राजीनामा दिला होता : संजय निरुपम
Lok Sabha elections 2024 : भ्रष्टाचार्‍यांना पक्षात घेऊन पंतप्रधान भ्रष्टाचाराशी कसे लढणार : संजय राऊत

Latest Marathi News टीकेचा आसूड ओढत गौरव वल्‍लभ यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; म्‍हणाले, ‘सनातनाविरोधी….’ Brought to You By : Bharat Live News Media.