नागपूर ; Bharat Live News Media वृत्तसेवा ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे दिल्लीत गेले असून देवेंद्रजींनी पिक्चर काढलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ ची स्क्रिप्ट तयार असल्याचे प्रत्युत्तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील टिकेबाबत दिले आहे.
उद्धव ठाकरे यांचा टोमणेसम्राट उल्लेख करत बावनकुळेंकडून खोचक टीका झाली. मद्य घोटाळ्याचे आरोपी अरविंद केजरीवाल यांच्या बचावासाठी आयोजित ‘ठगो का मेला‘ कार्यक्रमासाठी उबाठा गटाचे नेते आणि टोमणेसम्राट उद्धव ठाकरे दिल्लीत पोहोचले आणि टोमणे मारण्याचा कार्यक्रम केला.
उपमुख्यमंत्री देवेंद्रजींनी पिक्चर काढायचा ठरवलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची स्क्रिप्ट तयार आहे. त्याची काळजी उद्धव ठाकरेंनी करू नये. या शिवाय ‘वाझे की लादेन फाईल्स‘, ‘खिचडी फाईल्स‘, ‘कोविड बॅग फाईल्स‘ असे अनेक चित्रपट काढता येतील. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी टोमणे मारण्यापूर्वी घरात बसून केलेल्या अडीच वर्षाच्या कारभाराचा विचार करावा. तुम्ही देवेंद्रजींना कितीही टोमणे मारले तरी महाराष्ट्रातील जनता लोकसभा निवडणुकीत तुम्हाला कायमचा टोमणा मारल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
हेही वाचा :
Russia-Ukraine War : भीषण हल्ल्यांनी युक्रेन पुन्हा हादरला, रशियाने रात्रभर डागली क्षेपणास्त्रे, ड्रोन हल्लेही
INDIA alliance rally : देशात एका व्यक्तीचे, एका पक्षाचे सरकार धोकादायक : उद्धव ठाकरे
Lok Sabha Election 2024 | चंद्रपूर : भाजप-काँग्रेस यांच्यात अटीतटीचा रणसंग्राम
Latest Marathi News ‘देवेंद्रजींनी पिक्चर काढलाच तर ‘१०० कोटी वसुली फाईल्स‘ची स्क्रिप्ट तयार’ Brought to You By : Bharat Live News Media.