नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुणालयात दाखल

नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुणालयात दाखल

Bharat Live News Media ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली आहे. यामुळे त्यांना कुर्ला येथील क्रिटिकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्यानंतर रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. (Nawab Malik Health)
नवाब मलिक सध्या आरोग्याच्या कारणास्तव जामीनावर बाहेर आहेत. मलिक यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली नसल्याचे त्यांचे म्हणणे ग्राह्य धरून त्यांच्या जामिनाला सर्वोच्च न्यायालयाने जानेवारीमध्ये मुदतवाढ दिली होती. त्यावेळी त्यांच्या जामिनाला ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती.
Latest Marathi News नवाब मलिक यांची प्रकृती बिघडली, रुणालयात दाखल Brought to You By : Bharat Live News Media.