आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल?

चिराग दारूवाला :

चिराग दारूवाला हे प्रसिद्ध ज्‍योतिषी आहेत. सुप्रसिद्ध ज्‍योतिषी बेजान दारूवाला यांचे ते सुपुत्र आहेत. करीअर, आरोग्य, प्रेम, विवाह, अर्थ, व्यवसाय या संदर्भात ते मार्गदर्शन करतात. www. bejandaruwalla.com या वेबसाईटवर तसेच info@bejandaruwalla.com या मेलवर त्यांच्याशी संपर्क साधता येईल.
मेष : कुटुंब आणि नातेवाईकांसोबत आज चांगला वेळ जाईल, असे श्रीगणेश सांगतात. मित्रांसोबतची भेट लाभदायक ठरेल. तुम्हाला सामाजिक आणि कौटुंबिक प्रोत्साहन मिळेल. अनोळखी व्यक्तीबरोबर कोणताही व्‍यवहार करताना विचारपूर्वक निर्णय घ्‍या. छोट्याशा निष्काळजीपणामुळे तुमची फसवणूक होऊ शकते. व्यवसायात परिस्‍थिती जैसे थै राहिल.
वृषभ : तुमच्‍या संवाद कौशल्‍याचा इतरांवर तुमचा प्रभाव पडेल. कुटुंबात महत्त्वाच्या विषयावर चर्चा होऊ शकते. अहंकाराची भावना टाळा, अन्‍यथा वादाला सामोरे जावे लागेल. तुमच्यातील गुणांचा सकारात्मक पद्धतीने केलेला वापर लाभदायक ठरेल. आर्थिक स्थिती मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.
मिथुन : श्रीगणेश सांगतात की, आज आर्थिक बाबींसंदर्भात घेतलेले निर्णय यशस्‍वी होतील. कौटुंबिक सुखसोयींवरही खर्च कराल. धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्‍हाल. जास्त खर्चामुळे तुमचे बजेट बिघडू शकते. त्याची काळजी घ्या, अशी सूचना श्रीगणेश करतात. घरातील कोणाच्या तरी आरोग्याबाबत चिंता राहील. व्यवसायात अंतर्गत सुधारणा किंवा स्थान बदलण्याची गरज आहे.
कर्क : आज गुंतवणुकीशी संबंधित कामांमध्ये यश मिळेल. खर्च जास्त होईले पण उत्पन्नाचे साधनही चांगले असेल. कौटुंबिक आणि सामाजिक कार्यात वेळ व्‍यतित कराल. खूप आत्मकेंद्रितपणा तुमच्या नात्याला त्रास देऊ शकतो. तुमच्या सरावात लवचिकता राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कार्यक्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तीच्‍या मदतीने व्यवसायात यश मिळवू शकाल.
सिंह : श्रीगणेश म्‍हणतात की, अनोळखी व्यक्तीसोबतची भेट फायदेशीर ठरेल. मालमत्ता विक्री संदर्भात विचार करत असाल तर त्‍यावर लक्ष केंद्रित करा. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांच्‍या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. न्यायालयीन कामकाजा संदर्भात योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. पती-पत्नीमध्‍ये किरकोळ मतभेद होतील. थकवा जाणवेल.
कन्या : तुम्ही आज कामाप्रती समर्पित असाल. ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होत असून त्याचा लाभ घ्या, असे श्रीगणेश सांगतात. धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन कराल. आज मनात काही नकारात्मक विचार येऊ शकतात. याचा तुमच्या झोपेवरही परिणाम होऊ शकतो. तुमचा वेळ सकारात्मक विचारांच्‍या लोकांसोबत व्‍यतित करा. व्यावसायिक घडामोडींवर पूर्ण लक्ष द्या. आरोग्य उत्तम राहील.
तूळ : आज बहुतांश वेळ सामाजिक आणि राजकीय कार्यात व्‍यतित कराल, असे श्रीगणेश सांगतात. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीच्या मदतीने करिअरशी संबंधित समस्या सोडविण्‍यास मदत होईल. कुटुंबातील ज्‍येष्‍ठांचा स्नेह आणि आशीर्वाद तुमच्यासाठी वरदान ठरेल. स्वभावात चिडचिडेपणा आणि निराशा जाणवेल.दुखापतीपासून जपा. कुटुंबातील शिस्‍त कायम ठेवा.
वृश्चिक: दिनचर्येतील बदलामुळे तुमची कार्यक्षमता वाढेल. धर्म आणि कर्माशी संबंधित बाबींमध्येही तुम्ही योगदान द्याल. वारसाहक्काने मिळालेल्या मालमत्तेबाबत वाद टाळा. पैशाशी संबंधित कामे करताना काळजीपूर्वक विचार करा.रागावरही नियंत्रण ठेवा, असा सल्‍ला श्रीगणेश देतात.
धनु: श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही बहुतेक कामे नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. काही वेळा तुमच्या कामात व्यत्यय आल्याने काही वेळ वाया जाईल. कोणत्याही प्रकारच्या व्यावसायिक कामांत यश मिळेल.
मकर: श्रीगणेश सांगतात की, धार्मिक संस्थेला सहकार्य केल्याने मानसिक शांती मिळेल. तुमचा आदर आणि आध्यात्मिक वाढही होईल. मालमत्तेच्या खरेदी-विक्रीशी संबंधित योजना असतील. कोणत्याही प्रकारचे कागदपत्र व्‍यवहारांबाबत काळजी घ्या. एक छोटीशी चूक तुमच्यासाठी मोठी समस्या निर्माण करू शकते. व्यवसायिक कामे सामान्य राहतील. पती-पत्नीचे नाते आनंदी राहिल.
कुंभ:श्रीगणेश म्‍हणतात की, आज सर्व कामे व्यवस्थित पूर्ण होतील. तुम्हाला आंतरिक शांतीचा अनुभव येऊ शकतो. नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी संबंधात अधिक सुधारणा होईल. उत्पन्नाच्या साधनांमध्ये थोडी घट होऊ शकते. व्यवसायातील कामांकडे पूर्ण लक्ष देणे महत्वाचे आहे.
मीन : श्रीगणेश सांगतात की, आज तुम्ही प्रत्येक काम व्यावहारिक पद्धतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मित्र आणि नातेवाईक देखील तुमच्या बुद्धिमत्तेचा आदर करतील. संततीच्या बाजूने कोणतेही समाधानकारक परिणाम मिळाल्याने घरात उत्सवाचे वातावरण असेल. तुमच्या व्यावहारिक दृष्टिकोनामुळे कार्यक्षेत्रातील अनेक प्रकरणे मार्गी लागतील. पती-पत्नीमध्ये काही वाद होऊ शकतात. आरोग्य चांगले राहिल.