Breaking : पॉर्न फिल्म बनविणाऱ्यांचा पर्दाफाश ! ५ महिलांसह १८ जण ताब्यात

Breaking : पॉर्न फिल्म बनविणाऱ्यांचा पर्दाफाश ! ५ महिलांसह १८ जण ताब्यात

पिंपरी : Bharat Live News Media वृत्तसेवा : लोणावळा शहराच्या जवळच मळवली रेल्वे स्टेशन पासून काही अंतरावर असलेल्या पाटण गावाच्या हद्दीमध्ये एका खाजगी बंगल्यात पॉर्न फिल्म बनवण्याचा उद्योग करणाऱ्या टोळीचा लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून फिल्म अर्थात चित्रफीत बनवण्यासाठी लागणाऱ्या सहा लाख ७२ हजार ६२० रुपये किमतीच्या मुद्देमालासह १८ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक २९ मार्च रोजी पाटण गावाच्या हद्दीमध्ये असलेल्या आर्णव व्हिला (ता. मावळ, जि. पुणे) या एका खाजगी बंगल्यात अश्लिल, नग्न, बिभीस्त व्हिडीयो तयार करण्याचा उद्योग सुरू असल्याची गोपनीय खबर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना मिळाली.
या माहितीच्या आधारे छापा टाकण्यात आला. या छाप्यात पोलिसांना सदरच्या बंगल्यात संभोगाच्या बीभत्स चित्रफीत तयार करीत असलेली मंडळी रंगेहाथ मिळून आली. पोलिसांनी घटनास्थळावरून ५ महिला आणि १० पुरुषांसह हा बंगला बेकायदेशीरपणे भाड्याने देणाऱ्या आणि तो चालवणारे ३ जण अशा एकूण १८ जणांना ताब्यात घेऊन चित्रफीत तयार करण्यासाठी वापरलेले दोन कॅमेरे, वेगवेगळ्या लाईट, वायरलेस माईक, लॅपटॉप आदी मुद्देमाल जप्त केला आहे.
उप.नि. भारत भोसले यांनी याप्रकरणी सरकारी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विष्णु मुन्नासाहब साओ (३०, रा.परगना, कोलकत्ता), जावेद हबीबुल्ला खान (३५, रा.बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (२३, रा.रंगपुरी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (३८, रा.मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (२१, रा.दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (२९, रा. चंद्रपुर), समीर मेहताब आलम (२६, रा. अमरोहा, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेश चौबे (२९, रा. कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (२१, रा. रोनक सिटी, हरियाणा), विना भारत पोवळे (वय ३२, रा. खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (२८, रा.नालासोपारा वेस्ट, पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (३८, रा. वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (१९, सुरत, गुजरात), वंशज सचीन वर्मा (२१, रा.डेहराडुन) आणि मनीष हिरामण चौधरी (२०, रा.शास्त्रीनगर, हरीयाणा) यांना प्रथम ताब्यात घेऊन त्यातील १३ पुरुष आरोपींना अटक करण्यात आली आहे. या सर्वांच्या विरोधात अश्लिल, नग्न व बिभीस्त चित्रीकरण करून त्या चित्रफिती अवैध वेबसाईट्स व मोबाईल अप्लीकेशनवर अपलोड करून प्रसारीत व प्रचारीत करण्याची व्यवस्था केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याशिवाय सुखदेव चांगदेव जाधव (वय ५२) आकेश गौतम शिंदे (वय ३२), सनी विलास शेडगे (३५, सर्व रा.मळवली, ता. मावळ, जि. पुणे) यांनी स्वतःचे आर्थिक फायदया करीता संबंधित पुरुष व महिलांना त्यांचे कोणत्याही प्रकारची ओळखपत्रे न घेता, बंगल्यात पुरुष व त्यांच्या सोबतच्या महिलांचे संभोग करतानाचे तसेच अश्लिल व नग्न चित्रीकरण करून त्याच्या चित्रफिती तयार करत असल्याचे माहिती असताना देखील त्याबाबत पोलीसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता नमुदचा बंगला अश्लिल, नग्न व बिभीस्त व्हिडीयो तयार करण्याकरीता भाड्याने दिल्याचा आरोप ठेवत करील तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ हे करीत आहेत.
हेही वाचा

आळे येथे दिसून आली तरसाची दोन पिल्ले..!
5 पाच हजार द्या, उतारा घ्या; लाच घेताना ग्रामसेवकाला पकडले
सेवा विकास बँके गैरव्यवहार प्रकरण : रोझरीचा संचालक विनय अर्‍हानाला बेड्या

Latest Marathi News Breaking : पॉर्न फिल्म बनविणाऱ्यांचा पर्दाफाश ! ५ महिलांसह १८ जण ताब्यात Brought to You By : Bharat Live News Media.