नागपूर : ढाबा मालकाची हत्या, बोनस न दिल्याने नोकरांनी केला गेम

नागपूर : ढाबा मालकाची हत्या, बोनस न दिल्याने नोकरांनी केला गेम

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर ग्रामीणचे भाजपचे नेते राजू भाऊराव ढेंगरे (वय 48) यांची त्यांच्याच ढाब्यावर त्यांच्याच दोन नोकरांनी दिवाळीसाठी गावी जाऊ दिले नाही, बोनस दिला नाही म्हणून हत्या केली. या घटनेने दिवाळीला गालबोट लागले असून, पैसा कसा माणसाचा वैरी होतो आहे त्याची प्रचिती आली.
मध्यप्रदेशमधील मंडला येथील छोटू आणि आदी नामक या दोन नोकरांना दोन महिन्यांपूर्वी एका एजंटच्या माध्यमातून राजू ढेंगरे यांनी कामावर ठेवले होते. उमरेड रोडवरील पाचगाव विहिरगाव परिसरात राजू डेंगरे यांचा ढाबा असून, घटनेच्या रात्री जेवताना या तिघांचा वाद झाला. दिवाळी समोर असताना गावी जाऊ न देणे आणि बोनसचे पैसे देण्यास नकार डेंगरे यांच्या अंगलट आला. रात्री झोपेतच त्यांची या दोघांनी हत्या केल्याची महिती पोलिस तपासात उघड झाली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
हेही वाचा :

दिवाळी अंक चक्क बोलू लागले..! प्रकाशन संस्थांनी काढले ऑडिओ स्वरूपातील अंक 
Israel-Hamas war : गाझातील ‘अल शिफा’ रूग्णालयानजीकच धुमश्चक्री
शिष्यवृत्तीधारकांना दिवाळी भेट ; योजना संचालनालयाकडून विद्यार्थ्यांना 19 कोटींचे वितरण

The post नागपूर : ढाबा मालकाची हत्या, बोनस न दिल्याने नोकरांनी केला गेम appeared first on पुढारी.

नागपूर ; पुढारी वृत्‍तसेवा नागपूर ग्रामीणचे भाजपचे नेते राजू भाऊराव ढेंगरे (वय 48) यांची त्यांच्याच ढाब्यावर त्यांच्याच दोन नोकरांनी दिवाळीसाठी गावी जाऊ दिले नाही, बोनस दिला नाही म्हणून हत्या केली. या घटनेने दिवाळीला गालबोट लागले असून, पैसा कसा माणसाचा वैरी होतो आहे त्याची प्रचिती आली. मध्यप्रदेशमधील मंडला येथील छोटू आणि आदी नामक या दोन नोकरांना …

The post नागपूर : ढाबा मालकाची हत्या, बोनस न दिल्याने नोकरांनी केला गेम appeared first on पुढारी.

Go to Source