दैव बलवत्तर म्हणून राजापुरातील आठ जणांचा जीव वाचला

दैव बलवत्तर म्हणून राजापुरातील आठ जणांचा जीव वाचला

जमीर पठाण

कुरुंदवाड; Bharat Live News Media वृत्तसेवा : विशाळगडाला जाताना वाघझऱ्याजवळ चारचाकी तवेरा दरीत कोसळली, वाहनातील सातजण दरीत गेली अशी वार्ता वाऱ्यासारखी शिरोळ तालुक्यात, राजापूरात येऊन धडकली. त्या वाहनातील चालकापासून सर्वांचेच मोबाईलशी संपर्क होत नव्हता. नातेवाईकांची भंबेरी उडाली होती. 10 वर्षांपूर्वी विशाळगड जवळ दरीत कोसळलेल्या बोलेरो चारचाकीच्या अपघाताची चर्चा जोरदार रंगली होती, उलट-सुलट चर्चेला उधाण आले होते. अन…. राजापुरातील काहीजणांनी थेट घटनास्थळ गाठले. अन सर्वांना सुखरूप पाहून सुटकेचा निश्वास सोडला.
पहाटेच्या सुमारास ये-जा करणाऱ्या वाहनातून गाडीच्या क्रमांकावरून ही गाडी राजापुरची असल्याचे समजल्याने राजापुरात आलेल्या वार्तेची सर्वांनीच धास्ती घेतली होती. राजापुरातून मोबाईलवर त्यांच्याशी संपर्क साधला जात होता.मात्र, घाट माथ्यावर मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे वाहनतील लोकांशी संपर्क न झाल्याने राजापुरातील ग्रामस्थ आणि नातेवाईक भयभीत झाले होते. राजापुरातील काही ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहनातील नागरिक सुखरूप असल्याची माहिती दिल्याने ग्रामस्थांनीही सुटकेचा निश्वास सोडला.
राजापूर येथून चारचाकी गाडीतून शुक्रवारी (दि.31) सायंकाळी सात लोक विशाळगडकडे देवदर्शनाला गेले होते. वाघझऱ्यालगत दाट धुके असल्यामुळे चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि सदरची गाडी लगत असलेल्या चरित जाऊन उलटली. दरम्यान या गाडीतील सातजण कसेबसे बाहेर निघाले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही. सर्वत्र काळोख असल्यामुळे बचाव कार्य झाले नाही. यामुळे अपघातग्रस्त वाहनातील युवकांना रात्र अपघाताच्या ठिकाणी जागून काढावी लागली. मोबाईला रेंज नसल्याने त्यांचा अत्यावश्यक सेवेशी संपर्क होऊ शकला नाही.
वाहनाच्या क्रमांकावरून शिरूर तालुक्यातील राजापूर येथील असल्याचे समजले. त्या वाहनाचा अपघात झाल्याची वार्ता राजापुरात येऊन धडकली. यावेळी ग्रामस्थांनी वाहन मालक शिवगोंडा पाटील यांनी संपर्क साधला. दरम्यान त्यांनी काही ग्रामस्थांना घेऊन घटनास्थळ गाठले. चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन चरित उलटले. दैव बलवत्तर म्हणून या अपघातातील लोकांना किरकोळ दुखापत झाली. घटनास्थळी पोचलेल्या वाहन मालक व ग्रामस्थांनी उलटलेली गाडी जेसीबीच्या सहाय्याने सरळ केली.