ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर

ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  शनिवारी (दि. 11) येथील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी रविवारी (दि. 12) पुरंदर तालुक्यातील कार्यक्रम रद्द केले होते. खा. पवार यांची तपासणी करत डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता पवार यांची प्रकृती स्थिर असून, रविवारी (दि. 12) येथील गोविंदबागेत राज्यभरातून आलेल्या नागरिकांना त्यांनी भेट दिली तसेच अनेकांशी विविध विषयांवर चर्चा केली. शुक्रवारपासून पवार बारामतीत आहेत. दरवर्षी पवार कुटुंबीय बारामतीत एकत्रित दिवाळी साजरी करत असतात.
शनिवारी सकाळी दहा वाजता शरद पवार यांनी अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टची बैठक उरकली. दुपारी चारला विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना माहिती दिली. त्यानंतर डॉक्टरांकडून पवार यांची तपासणी करण्यात आली. ईसीजी काढण्यात आला. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला. त्यामुळे रविवारचे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले.
रविवारी डॉक्टरांकडून पुन्हा त्यांची तपासणी करण्यात आली. प्रकृती स्थिर असल्याने गोविंदबागेत रविवारी सकाळपासून त्यांनी नागरिकांना भेट दिली. रयत शिक्षण संस्थेचे शिष्टमंडळ सकाळीच पवार यांना भेटले. त्यानंतर दिवसभर राज्यभरातून विविध संघटना, नागरिक पवार यांना भेटत होते. पवारांना दीपावलीच्या शुभेच्छा देत होते. दरम्यान, गोविंदबागेत रविवारी दीपावली पाडव्याची तयारी सुरू होती. येथे व्यासपीठ उभारणीसह अन्य कामे केली जात होती.
हेही वाचा :

Pune : ‘ऑपरेशन मुस्कान 12’ला पुण्यातून होणार प्रारंभ
पुणे : जुन्नर तालुक्यात भाताचे उत्पादन घटणार

The post ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर appeared first on पुढारी.

बारामती : पुढारी वृत्तसेवा :  शनिवारी (दि. 11) येथील विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांनी रविवारी (दि. 12) पुरंदर तालुक्यातील कार्यक्रम रद्द केले होते. खा. पवार यांची तपासणी करत डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला होता. आता पवार यांची प्रकृती स्थिर असून, रविवारी (दि. 12) येथील गोविंदबागेत राज्यभरातून आलेल्या …

The post ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती स्थिर appeared first on पुढारी.

Go to Source