सिंधुदुर्ग : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, अज्ञातावर गुन्हा

सिंधुदुर्ग : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, अज्ञातावर गुन्हा

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात अपहरणासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर तीन तासांनी त्या अज्ञाताने मुलीला पुन्हा घराच्या परिसरात आणून सोडले. अज्ञात युवकाने आपल्याला पळवून नेल्‍याचे मुलीने पालकांना सांगितले. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.
आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात पोस्को अंतर्गत अपहरणाचा गुन्हा दाखल केला. संबंधित मुलीला नेणारी व्यक्‍ती कोण? याचा तपास करण्यात येणार आहे. त्यासाठी सीसीटीव्हीचा आधार घेण्यात येणार आहे, असे पोलिस म्हणाले.

महाशिवरात्री : भेटी लागे जीवा, लागलीसी आस; कुणकेश्‍वर यात्रोत्सव आजपासून सुरू

संबंधित मुलगी ही अचानक रात्री बेपत्ता झाली. त्यामुळे आई-वडिलांनी तिचा शोध घेतला. ती कोठेही आढळून न आल्याने त्यांनी सावंतवाडी पोलिस ठाण्यात धाव घेत आपली मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दिली.

युद्धाने उद्योग जगत धास्तावले https://t.co/OjwekP5mjcयुद्धाने-उद्योग-जगत-धास्तावले/ar #pudharinews #pudharionline
— Pudhari (@pudharionline) March 1, 2022

पोलिसांनी सुद्धा शोधकार्य सुरू केले. चार तासानंतर संबंधित मुलगी माघारी परतली. तिची चौकशी केली असता एका अज्ञात युवकाने आपल्याला पळवून नेत पुन्हा घराच्या परिसरात आणून सोडल्याचे तिने सांगितले.
हेही वाचा

महाशिवरात्रोत्सव : त्र्यंबकनगरीत बम बम भोलेचा गजर ; मंदिर रात्रभर खुले राहणार
Ichalkaranji : वॉटर एटीएमचा निधी परत जाणार? दीड वर्षांत झालं नाही ते महिन्यात कसं होणार
महागाईने मोडले कंबरडे. पैसाच राहिना शिल्‍लक; आर्थिक गणित जुळवताना नाकीनऊ

The post सिंधुदुर्ग : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, अज्ञातावर गुन्हा appeared first on पुढारी.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) पुढारी वृत्तसेवा: अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी अज्ञाताविरोधात अपहरणासह पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. घटनेनंतर तीन तासांनी त्या अज्ञाताने मुलीला पुन्हा घराच्या परिसरात आणून सोडले. अज्ञात युवकाने आपल्याला पळवून नेल्‍याचे मुलीने पालकांना सांगितले. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली. आई-वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  …

The post सिंधुदुर्ग : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले, अज्ञातावर गुन्हा appeared first on पुढारी.

Go to Source