मजगाव येथे शिवजयंती उत्साहात

मजगाव येथे शिवजयंती उत्साहात

वार्ताहर /मजगाव
मजगाव येथील गणपत गल्ली येथे श्री गणेश युवक मंडळाच्या फलकासमोर श्री छत्रपती शिवाजी महाराजांची 394 वी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी माजी अध्यक्ष शिवाजी पट्टण होते. प्रमुख पाहुणे म्हणून महादेव मल्लाप्पा मजुकर व अशोक सावंत-मजुकर हे होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज मूर्तीचे पूजन महादेव मजुकर यांच्या हस्ते झाले. श्रीफळ अशोक मजुकर यांनी वाढविले. राजहंसगडहून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत आतषबाजी करून नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी पट्टण यांनी स्वीकारली. यावेळी छ. शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर महिलांनी पाळणागीत म्हटले. महादेव मजुकर व अशोक मजूकर यांना शाल, श्रीफळ, फेटा देवून मंडळातर्फे गौरविण्यात आले. शिवाजी पट्टण यांनी मार्गदर्शनपर भाषण केले. सूत्रसंचालन सुरेश नागाप्पा पट्टण तर आभार प्रशांत वाडेकर यांनी मानले. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. येथील लक्ष्मी गल्ली, मारुती गल्ली, तानाजी गल्ली, गजानननगर येथेही शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.