यमनापूर येथे शिवजयंती

यमनापूर येथे शिवजयंती

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
यमनापूर येथील राजे ग्रुप व छत्रपती शिवाजी महाराज युवक मंडळ व ग्रामस्थांच्यावतीने हिंदवी स्वराज्य संस्थापक युगपुरूष छत्रपती उत्साहात साजरी करण्यात आली. तत्पूर्वी सकाळी 9 वाजता गावातील राजे ग्रुप व छत्रपती शिवाजी युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पन्हाळगडहून आणलेल्या शिवज्योतीचे गावच्या वेशीमध्ये गावचे ज्येष्ठ नागरिक खाचू पाटील यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी संपूर्ण गावभर शिवज्योत फिरविण्यात आली. सुवासिनींनी शिवज्योतीचे आरती ओवाळून स्वागत केले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीसमोर शिवज्योत ठेवण्यात आली. यावेळी खाचू पाटील यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. शामराव पाटील यांनी हार अर्पण केला तर नागेंद्र निलजकर यांनी श्रीफळ वाढविले. यावेळी गावातील सुवासिनी शांता संभाजीचे, अनुबाई पाटील, सुरेखा पाटील, सरिता पिंगट, शोभा पाटील, मयुरी पाटील यांच्या हस्ते पाळण्याचे पूजन करून पाळणा म्हटला. यावेळी गावातील असंख्य शिवभक्त महिला व नागरिक उपस्थित होते.