कंग्राळी खुर्द येथे शिवजयंती उत्साहात
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी खुर्द येथील गावच्या वेशीत प्रवेशद्वारापाशी हिंदवी स्वराज संस्थापक-युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज जयंती परंपरेनुसार गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते अश्वारूढ शिवपुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तर ग्रा. पं. अध्यक्षा दो•व्वा माळगी, उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील व अॅड. एम. जी. पाटील यांनी पाळणा पूजन करून श्रीफळ वाढविले. ग्रा. पं. माजी अध्यक्षा रुक्मिणी निलजकर, सदस्या लता पाटील व अन्य महिला शिवप्रेमीनीही शिवरायांचे पूजन करून पाळणा व आरती गायन केले. यावेळी महात्मा फुले मंडळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कंग्राळी खुर्द शाखा, प्रगती मंडळ यांच्यावतीनेही शिवरायांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून पूजन केले. या निमित्ताने ग्रा. पं. उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील मार्कंडेय साखर कारखाना उपाध्यक्ष आर. आय. पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना शिवरायांचा आदर्श व इतिहास समोर ठेवून सर्वांनी कार्यरत राहून समाजाचा विकास साधूया, असे आवाहन केले. यावेळी बी. एन. पुजारी, सागर पाटील, मनोहर पाटील, बी. डी. मोहनगेकर, के. बी. पाटील, ग्रा. पं. सदस्य महेश धामणेकर, महेश खंडागळे, बाबू पावशे, माजी अध्यक्षा मीना मुतगेकर, सविता पाटील, बाळू बसरीकट्टी, अविनाश बाळेकुंद्री, एम.वाय. पाटील, अनिल बाळेकुंद्री, मनोहर पाटील यांच्यासह शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांच्यावतीने प्रसाद रूपाने आंबील व मिठाईचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन गजानन पाटील यांनी केले. अॅड. एम. जी. पाटील यांनी आभार मानले.
Home महत्वाची बातमी कंग्राळी खुर्द येथे शिवजयंती उत्साहात
कंग्राळी खुर्द येथे शिवजयंती उत्साहात
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक कंग्राळी खुर्द येथील गावच्या वेशीत प्रवेशद्वारापाशी हिंदवी स्वराज संस्थापक-युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज जयंती परंपरेनुसार गुरुवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रा. पं. माजी अध्यक्ष यल्लाप्पा पाटील, प्रगती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या हस्ते अश्वारूढ शिवपुतळ्याचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तर ग्रा. पं. अध्यक्षा दो•व्वा माळगी, उपाध्यक्ष कल्लाप्पा पाटील व अॅड. […]