नंदगड येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक

नंदगड येथे शिवजयंतीनिमित्त मिरवणूक

नंदगड : परंपरेनुसार केली जाणारी शिवजयंती नंदगड येथे उत्साहात साजरी करण्यात आली. गुरुवारी पहाटे सनई चौघडा वादन करून शिवजयंती उत्सवाचा प्रारंभ झाला. महिलांनी पाळणागीत म्हणून दुपारी 12 वा. शिवजन्मोत्सव साजरा केला. यावेळी नंदगड ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव, गुंडू हलशीकर, प्रमोद पाटील, सागर पाटील, राजू पाटील, नागो पाटील, प्रसाद पाटील, अर्जुन धबाले, गुंजाप्पा पाटील, संदीप पारिश्वाडकर, राजीव पाटील, सागर पाटील, किरण चन्नेवाडकरसह कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या. यावेळी शिवमूर्तीची पूजा करण्यात आली. सायंकाळी सजवलेल्या छकड्या गाडीमधून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ठेवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी युवानेते प्रशांत लक्केबैलकर यांच्या हस्ते मिरवणुकीचे उद्घाटन झाले. गावातील अनेक ग्रामस्थ मिरवणुकीत सहभागी झाले होते.