तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जोरदार वारा

तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जोरदार वारा

विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
वार्ताहर /सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शुक्रवारी दुपारनंतर जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उष्म्याने लाहीलाही झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पूर्व भागातील बसवण कुडचा, निलजी, मुतगे, शिंदोळी, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री आदी भागांमध्ये दुपारी तीननंतर पावसाला प्रारंभ झाला. जोरदार वारा व विजेच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सायंकाळपर्यंत सुरूच होता. पूर्व भागामध्ये पावसाचा म्हणावा तसा जोर नसला तरी या पावसाने पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना चालना मिळणार आहे.