गोधोळी येथे शिवजयंती साजरी

गोधोळी येथे शिवजयंती साजरी

वार्ताहर /नंदगड
गोधोळी व परिसरातील अनेक गावात शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. शिवजयंतीनिमित्त गुरुवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर महिलांनी छत्रपती शिवाजीराजांचा पाळणा म्हटला. यावेळी गोधोळी येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळाचे अध्यक्ष दत्ता बिडकर, उपाध्यक्ष उदय कदम तसेच भीमाप्पा बजंत्री, गिरीश कोळवी, दत्ताराम हळब आदींसह अनेक महिला व नागरिक उपस्थित होते.