T20 विश्वचषक 2024 पूर्वी ICCची उपांत्य फेरीसाठी खास योजना

T20 विश्वचषक 2024 पूर्वी ICCची उपांत्य फेरीसाठी खास योजना

क्रिकेटचा महाकुंभ T20 विश्वचषक 2024 1 जूनपासून सुरू होत आहे. या कारणामुळे चाहते खूप उत्सुक आहेत.  यावेळी T20 विश्वचषकात 20 संघ सहभागी होत आहेत.आयसीसीने यासाठीचे वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे.

यासाठी पहिली उपांत्य फेरी 26 जूनला तर दुसरी उपांत्य फेरी 27 जूनला होणार आहे. 29 जून रोजी अंतिम सामना होणार आहे

 

अहवालानुसार, ICC ने T20 विश्वचषक 2024 च्या दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी अतिरिक्त वेळ 250 मिनिटांनी वाढवला आहे.जेणेकरून सामना त्याच दिवशी संपेल याची खात्री करता येईल. दुसऱ्या उपांत्य फेरीसाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही.कारण फायनल 29 जूनला आहे.

पहिला उपांत्य सामना 26 जून रोजी त्रिनिदाद येथे होणार आहे. या सामन्यात पाऊस पडला तर आयसीसीने या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवला आहे.

त्यानंतर 27 जूनपर्यंत सामना सुरू राहणार आहे. दुसरा उपांत्य सामना 27 जून रोजी गयाना येथे खेळला जाईल, जो भारतीय वेळेनुसार रात्री 8.30 वाजता सुरू होईल. हा सामना त्याच दिवशी संपेल. कारण ICC ने या सामन्यासाठी सुमारे चार तासांचा कालावधी वाढवला आहे.

 

2024 च्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाला A गटात ठेवण्यात आले आहे. या गटात भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, नेदरलँड, कॅनडा आणि अमेरिका या संघांचा समावेश आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडविरुद्ध होणार आहे. 9 जून रोजी भारतीय संघ पाकिस्तानविरुद्ध शानदार सामना खेळणार आहे. 

 

20 विश्वचषक 2024 साठी टीम इंडिया: 

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज. 

 

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद, आवेश खान. 

 

Edited by – Priya Dixit

 

Go to Source