पेटीएमकडून कर्मचारी कपात

पेटीएमकडून कर्मचारी कपात

मुंबई :
फिनटेक क्षेत्रातील वन 97 कम्युनिकेशनची सहकारी कंपनी पेटीएम यांनी कर्मचाऱ्यांच्या कपातीच्या धोरणाला सुरुवात केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. किती कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे याबाबतची माहिती मात्र कंपनीने दिलेली नाही.
कर्मचाऱ्यांची अन्यत्र भरती करण्यासंदर्भातले पाऊल कंपनीने उचलले असल्याचे सांगितले जात आहे. जानेवारी ते मार्च 2024 या तीन महिन्यांमध्ये यांच्या कर्मचाऱ्यांची संख्या तिमाही आधारावर पाहता 3500 ने घटून 36,521 वर राहिली आहे. अलीकडच्या काळामध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकेच्या सेवांवर बंदी लादली होती. तेव्हापासून या कंपनीवर संकटांचे ढग दाटत आले आहेत.