ऊसतोडणी मजुरीत वाढ करा

बेळगाव : स्वाभिमानी ऊस तोडणी व वाहतूक संस्था महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातर्फे ऊस तोडणी मजुरीत वाढ करण्याची मागणी साखर आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. राज्यातील विविध सहकारी व खासगी साखर कारखान्यांना उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडून कारखान्यांना पाठविण्यासाठी ऊसतोड कामगारांची गरज असते. दर तीन वर्षांनी विविध कामगार संघटनांद्वारे निश्चित केले जातात. 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांच्या करारानुसार कमिशनशिवाय […]

ऊसतोडणी मजुरीत वाढ करा

बेळगाव : स्वाभिमानी ऊस तोडणी व वाहतूक संस्था महाराष्ट्र, कर्नाटक राज्यातर्फे ऊस तोडणी मजुरीत वाढ करण्याची मागणी साखर आयुक्तांना निवेदनाद्वारे केली. राज्यातील विविध सहकारी व खासगी साखर कारखान्यांना उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडून कारखान्यांना पाठविण्यासाठी ऊसतोड कामगारांची गरज असते. दर तीन वर्षांनी विविध कामगार संघटनांद्वारे निश्चित केले जातात. 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षांच्या करारानुसार कमिशनशिवाय 273.14 दर निश्चित केला आहे. वजावटीत 34 टक्के अन् खटल्याच्या कमिशनमध्ये 1 टक्का वाढ केल्यास तो 366 आणि 20 टक्के असा होतो. निश्चित दरानुसार राज्यातील सर्व साखर कारखान्यांनी तोडणीचे दर देणे गरजेचे असल्याचे निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. कमी दरामुळे ऊसतोडपे पुढील गळीत हंगामात कामावर येणार नाहीत, अशी चिन्हे आहेत. त्यामुळे निश्चित दरानुसारच कामगारांना पैसे द्यावेत, अशी मागणी स्वाभिमानी शुगरकेन कटींग ट्रान्स्पोर्ट असोसिएशन तसेच विविध संघटनांतर्फे केली आहे.