‘बीएससी’तर्फे मोफत दंतचिकित्सा शिबिर

‘बीएससी’तर्फे मोफत दंतचिकित्सा शिबिर

बेळगाव : बी. एस. चन्नबसाप्पा अॅण्ड सन्स यांच्यातर्फे मोफत दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दि. 13 पासून या शिबिराला सुरुवात झाली असून दि. 14, 15 व 16 मे पर्यंत हे शिबिर होणार आहे. बीएससीच्या सर्व ग्राहक व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये व्हाईट डेन्टल क्लिनीकच्या डॉ. स्नेहा गुजर व डॉ. निकिता गुजर यांनी दंत चिकित्सेसंदर्भात मार्गदर्शन केले, असे बीएससीचे व्यवस्थापक अहमद जमादार यांनी कळविले आहे.