नितीश कुमार ‘इंडिया’ आघाडीत येणार? तेजस्‍वी यादव म्‍हणाले, “पुढे काय…”

नितीश कुमार ‘इंडिया’ आघाडीत येणार? तेजस्‍वी यादव म्‍हणाले, “पुढे काय…”


Bharat Live News Media ऑनलाईन डेस्‍क : लोकसभेच्या निवडणुकीचे निकाल काल (मंगळवार) घोषित झाले. या निकालाने सत्‍तेची रस्‍सीखेच सुरू झाली आहे. सत्‍तास्‍थापनेसाठी भाजप प्रणित एनडीएबरोबरच इंडिया आघाडीही प्रयत्‍नात आहे. त्‍या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींनी पुन्हा एकदा वेग घेतला आहे. त्‍या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि तेजस्‍वी यादव एकाच विमानाने दिल्‍लीला रवाना झाले आहेत. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. यानंतर माध्‍यमांशी बोलताना तेजस्‍वी यादव यांनी आपली भूमिका स्‍पष्‍ट केली.
इंडिया आघाडीचे सरकार स्‍थापन होणार का, या प्रश्‍नाला उत्तर देताना तेजस्‍वी यादव म्‍हणाले की, “थोडा धीर धरा. थांबा आणि पहा. तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्‍याबरोबर एकत्र विमान प्रवास केल्‍याचा फोटो व्हायरल होत असल्‍याबाबत त्‍यांनी स्‍पष्‍ट केले की, “आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आता पुढे काय होणार हे पाहावे लागले.”

#WATCH | Delhi: When asked if INDIA alliance will try to have their govt at the Centre, RJD’s Tejashwi Yadav says, “Have some patience. Wait & watch.”
As photos of Bihar CM Nitish Kumar & him travelling on the same flight to Delhi go viral, he says, “We greeted each other. Baaki… pic.twitter.com/3JqKE7Eaes
— ANI (@ANI) June 5, 2024

देशातील जनतेने संविधान आणि संविधान आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी मतदान केले गेले आहे. देशातील जनातच सर्वश्रेष्‍ठ आहेत. आज इंडिया आघाडीची सायंकाळी बैठक होणार आहे. यानंतर काय निर्णय होतो हे पाहावे लागेल.

#WATCH | Delhi: RJD leader Tejashwi Yadav says, “…Voting has been done against tyranny. Voting has been done to safeguard the Constitution and democracy. I think ‘janata’ is ‘maalik’. Let’s see what is decided after the meeting in the evening today…” pic.twitter.com/MVp8z300Ms
— ANI (@ANI) June 5, 2024

 
नुकतीच नितीशकुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्‍यात कालच्या निकालानंतर आज एनडीए आणि इंडिया आघाडी यांच्या दिल्‍लीत बैठका होणार आहेत. त्‍यात नितीशकुमार हे एनडीएच्या बैठकीला उपस्‍थित राहण्यासाठी दिल्‍लीला रवाना झाले तर तेजस्‍वी यादव हे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्‍थित राहण्यासाठी दिल्‍लीला रवाना झाले. नितीश कुमारांना सोबत घेण्याचे इंडिया आघाडी प्रयत्‍न करत असल्‍याची चर्चा सुरू झाली आहे. आज इंडिया आघाडीच्या नेत्‍याची निवड हाेणार असल्‍याचे उद्‍धव ठाकरे यांनी सांगितले हाेते. उद्‍धव ठाकरे यांनी भाजपने ज्‍यांना त्रास दिला ते नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे आमच्याकडे येतील असे सांगून इंडिया आघाडीच्या सत्‍तेच्या हालचालींचे संकेत दिले होते.
नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी साथ दिल्‍यास इंडिया आघाडीची सत्‍ता स्‍थापण करू असा विश्वास शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राउत यांनी व्यक्‍त केला आहे. त्‍यात आज नितीशकुमार आणि तेजस्‍वी यादव एकाच विमानाने दिल्‍लीला रवाना झाल्‍याने चर्चांना उघाण आले आहे.

Go to Source