सलग पाचव्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक आनंदाची बातमी आली आहे. 22 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाचा साठा 14 कोटी डॉलर्सने वाढून 642.631 अब्ज डॉलर्सच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली. परकीय चलनाचा साठा वाढलेला हा सलग पाचवा आठवडा आहे. यापूर्वीच्या आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलनाचा साठा 6.39 अब्ज डॉलरने वाढून 642.49 अब्ज डॉलरवर पोहोचला होता. सप्टेंबर 2021 मध्ये देशाच्या परकीय चलन साठ्याने 642.45 अब्ज डॉलर्स इतका उच्चांक गाठला होता. परंतु, जागतिक घडामोडींमुळे निर्माण होणाऱ्या दबावांदरम्यान मध्यवर्ती बँकेने ऊपयाची घसरण रोखण्यासाठी भांडवली राखीव निधीचा वापर केल्यामुळे चलन साठ्यात थोडीशी घसरण झाली.
Home महत्वाची बातमी सलग पाचव्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात वाढ
सलग पाचव्या आठवड्यात परकीय चलनसाठ्यात वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशाच्या अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर एक आनंदाची बातमी आली आहे. 22 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताच्या परकीय चलनाचा साठा 14 कोटी डॉलर्सने वाढून 642.631 अब्ज डॉलर्सच्या नव्या उच्चांकावर पोहोचला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ही माहिती दिली. परकीय चलनाचा साठा वाढलेला हा सलग पाचवा आठवडा आहे. यापूर्वीच्या आठवड्यात देशाचा एकूण परकीय चलनाचा साठा 6.39 […]