मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा

मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा

वार्ताहर/ किणये
दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचालित मच्छे येथील व्ही. एस. पाटील हायस्कूलमध्ये जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना पर्यावरण दिनाचे महत्त्व सांगून ‘झाडे लावा झाडे जगवा’चा संदेश मुख्याध्यापक ए. बी. पाटील यांनी दिला. यावेळी शिक्षिका प्रगती एम. चौगुले, सोनाली एन. पाटील यांनी पर्यावरण दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेसभोवती स्वच्छता मोहीम राबवून एस. एच. पाटील, एस. आर. कम्मार, पी. एम. पाटील, पी. के. चव्हाण, ए. पी. नाकाडी, के. पी. गावडे यांनी वृक्षारोपण केले.
यावेळी के. बी. रंगाई, के. एस. सुळगेकर, एस. जी. तिनईकर आदी उपस्थित होते.