पेंडूर देवस्थान ट्रस्टच्यावतीने रेनकोट वाटप
कट्टा / वार्ताहर
श्री देव वेताळ, सातेरी, रवळनाथ, पावणाई, लिंग आदी देवस्थान ट्रस्ट पेंडूर, ता- मालवण, जि- सिंधुदुर्ग यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून खरारे पेंडूर ग्रामपंचायतचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी/वायरमन आणि देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी अशा एकुण नऊ जणांना पावसाळ्यानिमित्त रेनकोटचे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.शिवराम सावंत पटेल, सरचिटणीस श्री.अमित रेगे कुळकर्णी, खजिनदार श्री. सुनील परब, ट्रस्टचे विश्वस्त श्री.दाजी सावंत, श्री.प्रमोद सावंत, श्री.दिलीप परब आदी मान्यवर उपस्थित होते. देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून वेळोवेळी करण्यात आलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल गावातील नागरिकांनी समाधान व्यक्त केलेले असून गावाच्या विकास प्रक्रियेमध्ये देवस्थान ट्रस्टने प्रमुख भूमिका वेळोवेळी निभवावी अशी देखील अपेक्षा व्यक्त केली आहे.
Home महत्वाची बातमी पेंडूर देवस्थान ट्रस्टच्यावतीने रेनकोट वाटप
पेंडूर देवस्थान ट्रस्टच्यावतीने रेनकोट वाटप
कट्टा / वार्ताहर श्री देव वेताळ, सातेरी, रवळनाथ, पावणाई, लिंग आदी देवस्थान ट्रस्ट पेंडूर, ता- मालवण, जि- सिंधुदुर्ग यांच्या वतीने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून खरारे पेंडूर ग्रामपंचायतचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी/वायरमन आणि देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी अशा एकुण नऊ जणांना पावसाळ्यानिमित्त रेनकोटचे वाटप करण्यात आले. सदर प्रसंगी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री.शिवराम सावंत पटेल, सरचिटणीस श्री.अमित रेगे कुळकर्णी, खजिनदार […]