सरकारी कर्मचा-यांना खूशखबर! ‘या’ राज्यात DAमध्ये 4 टक्क्यांनी वाढ

सरकारी कर्मचा-यांना खूशखबर! ‘या’ राज्यात DAमध्ये 4 टक्क्यांनी वाढ

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : सरकारी कर्मचारी महागाई भत्ता (DA) वाढण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. महिनाअखेरीस वाढलेला पगार आल्यावर संपूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. केंद्र सरकारचे कर्मचारी सध्या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीतील महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत आहेत. येत्या काही महिन्यांत सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ करणार आहे. यापूर्वी सिक्कीममधून एक चांगली बातमी आली आहे. सिक्कीम सरकारने आपल्या कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट दिली आहे. सिक्कीमच्या नवनिर्वाचित सरकारने पहिल्या कॅबिनेट बैठकीत महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ जाहीर केली आहे.
1 जुलै 2023 पासून लागू
डीएमध्ये ही वाढ 1 जुलै 2023 पासून लागू झाली आहे. सिक्कीम क्रांतीकारी मोर्चा सरकारने मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतला. प्रेमसिंग तमांग हे सलग दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री बनले आहेत. या 4 टक्क्यांच्या वाढीमुळे सिक्कीम सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत 46 टक्क्यांवर पोहोचली आहे. डीएमधील या वाढीमुळे चालू आर्थिक वर्षात राज्याच्या तिजोरीवर 174.6 कोटी रुपयांचा परिणाम होईल.
आठवा वेतन आयोग कधी येणार?
7 मार्च रोजी केंद्र सरकारने डीए 4 टक्क्यांनी वाढवून 50 टक्के केला होता. या 4 टक्के वाढीचा लाभ 1 कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मिळत असून तो 1 जानेवारी 2024 पासून लागू झाला आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांच्या एचआरएमध्येही वाढ करण्यात आली आहे. डीए मूळ वेतनाच्या 50 टक्क्यांपर्यंत वाढल्याने, रेल्वेसह अनेक केंद्र सरकारच्या संस्थांनी 8 व्या वेतन आयोगाची मागणी केली आहे. अहवालानुसार आठवा वेतन आयोग जानेवारी 2026 पासून लागू होऊ शकतो.