Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ज्वर की विषप्रयोग?

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू ज्वर की विषप्रयोग?

Chhatrapati Shivaji Maharaj Punyatithi 2024 :  1674 साली राज्याभिषेक झाल्यानंतर अवघ्या 6 वर्षात महान राजा हे जग सोडून जातील हे कोणालाही स्वीकारणे अशक्य होते. हिंदवी स्वराज्याचे स्वप्न पाहणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या 50 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या सह त्यांच्या चवथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती झाल्या.

 

वयाच्या 50 व्या वर्षी अचानक मरण आल्यामुळे त्यांच्या मृत्यूमागे नेमके कारण काय होते हा नेहमीच संशोधनाचा भाग राहिला आहे. अनेकांच्या मते थकव्यामुळे आजार होऊन ज्वर झाल्यामुळे तर काहींच्या मतेगुडघे रोगाने मरण पावले तर काही जणांना आरोप आहे की त्यांच्या मृत्यूमागे त्याच्या एका राणीचा हात होता. महाराजांच्या पत्नी सोयराबाई यांनी काही मंत्र्यांसह त्यांची हत्या केली होती असे मानले जाते. त्यांनी महाराजांना विष दिले होते, त्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊन शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला असे काही जणांचे मत आहे. तरी यामागे काय सत्य आहे हे स्पष्टपणे सांगता येत नाही. शिवाजीच्या दुसऱ्या पत्नीचे पुत्र संभाजी यांनी गादीवर बसू नये, अशी सोयराबाईंची इच्छा होती. त्यांना वाटत असे की त्यांचाच मुलगा या गादीचा उत्तराधिकारी झाला पाहिजे ज्यांचे वय त्यावेळी फक्त 10 वर्षे होते.

 

ऐतिहासिक पुराव्यांमधून केवळ दोन प्रकारची माहिती पुढे येते ती म्हणजे एकतर ज्वर झाल्यामुळे हा प्रसंग आला तर दुसरे म्हणजे त्यांच्यावर विषप्रयोग झाला असावा.

 

ब्रिटीश नोंदी सांगतात की 12 दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्ताऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. तथापि शिवाजीराजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. शिवाजीराजांच्या हयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई या त्यांच्या अंत्यसंस्कारात सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही.

 

उत्खननात सापडलेल्या शिवरायांच्या अस्थींबाबतही मतभेद आहेत. 1926-27 मध्ये महाराष्ट्रातील रायगड किल्ल्यावर उत्खनन केलेल्या काही अस्थी शिवाजींच्या होत्या असे मानले जाते. या घरामध्ये शिवाजींचा मृत्यू झाल्यामुळे असे मानले जाते.

 

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या 16 व्या वर्षी शिवाजीने तोरणा किल्ला आणि वयाच्या 17 व्या वर्षी रायगड आणि कोंढाणा किल्ले ताब्यात घेतले होते. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुघलांशी पहिला सामना झाला ज्यामध्ये ते जिंकले. 1674 मध्ये मुघलांना पराभूत करून ते छत्रपती झाले आणि दक्षिणेकडे त्यांचे साम्राज्य पसरले.

 

एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान, पराक्रमी, आपल्या जाज्वल्य पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयांच्या मनात सुवर्णाक्षरांनी आजतायगत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील. 

रायगडावरील जगदीश्र्वर मंदिराच्या पूर्वदरवाजापासून जरा अंतरावर अष्टकोनी चौथरा म्हणजेच महाराजांची समाधी. शिवाजी महाराजांची समाधी ही त्यांच्या निधनानंतर शंभुराजांनीच बांधली असल्याचे इतिहासकरांचे मत आहे. इतिहास सांगितल्याप्रमाणे रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधी महात्मा ज्योतीबा फुले यांनी शोधली आणि शिवजयंती साजरी करायला सुरुवात केली असा उल्लेख आहे.