देशात सत्तेचा गैरवापर होतोय : शरद पवार

देशात सत्तेचा गैरवापर होतोय : शरद पवार

वर्धा; Bharat Live News Media वृत्तसेवा : देशात सध्या अघोषित आणीबाणी दिसून येत असून सत्तेचा गैरवापर होत आहे, अशी जळजळीत टीका शरद पवार यांनी आज (दि.२) वर्धात सरकारवर केली. वर्धा येथील अनेकांत स्वाध्याय मंदिर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांचा नामांकन अर्ज दाखल करण्याच्या अनुषंगाने रॅलीपूर्वी आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार रणजित कांबळे, अभिजीत वंजारी, उमेदवार अमर काळे, हर्षवर्धन देशमुख, चारूलता टोकस, माजी आमदार सुरेश देशमुख, वीरेंद्र जगताप, नरेश ठाकरे, शेखर शेंडे, सुधीर कोठारी, राजू तिमांडे, जिया पटेल, सुनील राऊत, मनोज चांदूरकर, अतुल वांदिले, समीर देशमुख, नीलेश धुमाळ आदी उपस्थित होते.
यावेळी रॅलीमध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघातील महविकास आघाडीचे पदाधिकारी, नेतेमंडळी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती दर्शवली. अनेकांत स्वाध्याय मंदिर येथून रॅलीची सुरूवात झाली. शहरातील विविध मार्गांनी रॅलीने मार्गक्रमण केले. रॅलीदरम्यान खुल्या वाहन सजवून त्यामध्ये नेत्यांची उपस्थिती होती. यामध्ये खुद्द शरद पवार सहभागी होते. त्यांनतर शरद पवार यांच्या उपस्थितीत नामांकन अर्ज दाखल करण्यात आला. त्यांनतर शरद पवार यांनी सुरेश देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसह महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकार्‍यांशी संवाद साधला व त्यांची मते जाणून घेतली.
हेही वाचा : 

जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप! दोन बडे नेते कमळाची साथ सोडून मशाल हाती घेणार
खासदार हेमंत पाटील मुंबईत तळ ठोकून; ३०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना
धनुष्यबाण चिन्हावर लढण्याची मला कोणतीही ऑफर नव्हती : माजी खासदार संजीव नाईक यांचा खुलासा

Latest Marathi News देशात सत्तेचा गैरवापर होतोय : शरद पवार Brought to You By : Bharat Live News Media.