लखनौला पहिला धक्का; के. एल. राहूल बाद

लखनौला पहिला धक्का; के. एल. राहूल बाद

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2024 च्या 15 व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होत आहे. हा सामना बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने नाणेफेक जिंकून लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (RCB vs LSG)
लखनौला पहिला धक्का; के. एल. राहूल बाद
लखनौ सुपरजायंट्सला 53 च्या स्कोअरवर पहिला धक्का बसला. कर्णधार केएल राहुल 14 चेंडूत 20 धावा करून बाद झाला. त्याला मॅक्सवेलने मयंक डागरच्या हाती झेलबाद केले.
दोन्ही संघात बदल
बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिसने प्लेइंग-11 मध्ये बदल केला आहे. वेगवान गोलंदाज अल्झारी जोसेफच्या जागी वेगवान गोलंदाज रीस टोपलीला संघात संधी देण्यात आली आहे. लखनौचा कर्णधार केएल राहुलनेही प्लेइंग-11 बदल करत मोहसीन खानच्या जागी यश ठाकूरला संघात स्थान दिले आहे. आत्तापर्यंत दोन्ही संघांना स्पर्धेमध्ये प्रत्येकी एकच सामना जिंकता आला आहे. बेंगळुरूने तीनपैकी एक सामना जिंकला आहे. तर लखनौने दोनपैकी एक सामना जिंकला आहे.

News from the centre, Captain Faf has won the toss and we’ll chase tonight! 🪙🗞️
☝️ change in the XI:
Topley 🔁 Alzarri#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #RCBvLSG @qatarairways pic.twitter.com/nx5rsUaNiu
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 2, 2024

हेही वाचा : 

धुळे जिल्ह्यावर पाणी संकट, प्रकल्पांमध्ये अवघा ‘इतका’ पाणीसाठा; टंचाई निवारणासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना
लाखो गुरांचा बळी घेणाऱ्या Lumpy Skinचा उद्रेक कसा झाला? संशोधकांनी शोधले उत्तर
हार्दिक पंड्याची ‘मुंबई इंडियन्‍स’वर प्रेरणादायी पोस्‍ट, “या संघाबद्दल तुम्हाला…”

Latest Marathi News लखनौला पहिला धक्का; के. एल. राहूल बाद Brought to You By : Bharat Live News Media.