गौप्यस्फोट करण्याचा आतिशी यांचा इशारा

गौप्यस्फोट करण्याचा आतिशी यांचा इशारा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दिल्लीच्या पॅबिनेट मंत्री आणि आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्या आतिशी यांनी मंगळवार, 2 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आपण मोठा खुलासा करणार असल्याचे सोमवारी जाहीर केले. आतिशी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिल्ली न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर सोमवारी तिहार तुऊंगात आणण्यात आले. त्यानंतर काही वेळातच त्यांनी ‘एक्स’वर ट्विट केले. आता त्या नेमका काय गौप्यस्फोट करतात हे मंगळवारी सकाळीच स्पष्ट होणार आहे. यापूर्वी ईडी हे भाजपचे राजकीय शस्त्र म्हणून काम करत असून केजरीवाल यांच्या फोनमधील माहिती पाहून आपची लोकसभा निवडणुकीची रणनीती त्यांना जाणून घ्यायची असल्याचा आरोप आतिशी यांनी शुक्रवारी केला होता.