पाकमधील प्रकल्पाचा विस्तार चीनने रोखला

पाकमधील प्रकल्पाचा विस्तार चीनने रोखला

बीजिंग; वृत्तसंस्था : चीनचा पाकिस्तानवरील विश्वास कमी होत चालला असून आता चीनने 60 अब्ज डॉलर्स (सुमारे 5 लाख कोटी रुपये) रकमेच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचा (सीपीईसी) विस्तार थांबवला आहे. एवढेच नव्हे तर चीनने पाकिस्तानमधील ऊर्जा, जल व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासही स्पष्ट नकार दिला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, खैबर-पख्तुनख्वा आणि पाकव्याप्त काश्मीरसह किनारपट्टी भागांत पर्यटनाला चालना देण्यासाठी गुंतवणूक करण्यापासून चीननेही माघार घेतली आहे.
चीनचा विश्वास डळमळला
पाकिस्तानातील राजकीय अस्थिरता आणि गरिबीसोबतच चीनकडून पाकने खूप मोठे कर्ज घेतले आहे. अशा परिस्थितीत कर्जफेड होईल की नाही, याबाबत चीनचा विश्वासही डळमळला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानच्या ज्या भागातून हा कॉरिडॉर जातो, तेथील सुरक्षा व्यवस्था अतिशय तकलादू आहे. याखेरीज बलुच लिबरेशन आर्मी चीनसाठी डोकेदुखी ठरली आहे. अल कायदा आणि इसिसने चीनच्या कॉरिडॉर प्रकल्पालाही लक्ष्य केले आहे.
या पार्श्वभूमीवर, चीनने स्पष्टपणे सांगितले आहे की, पाकिस्तानची अंतर्गत परिस्थिती, सुरक्षा व्यवस्था आणि आर्थिक आणि राजकीय स्थैर्य याबद्दल आमचे समाधान झाल्यानंतरच तिथे नवीन प्रकल्पात गुंतवणूक केली जाईल. चीनने अशी रोखठोक भूमिका घेतल्यामुळे पाकिस्तानपुढे आणखी एक पेच उभा ठाकला आहे. एवढे दिवस पाकिस्तानला चीन आपला विश्वासू सहकारी मानत होता. मात्र, आता हे समीकरण बदलू लागले आहे.
The post पाकमधील प्रकल्पाचा विस्तार चीनने रोखला appeared first on पुढारी.

बीजिंग; वृत्तसंस्था : चीनचा पाकिस्तानवरील विश्वास कमी होत चालला असून आता चीनने 60 अब्ज डॉलर्स (सुमारे 5 लाख कोटी रुपये) रकमेच्या चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर प्रकल्पाचा (सीपीईसी) विस्तार थांबवला आहे. एवढेच नव्हे तर चीनने पाकिस्तानमधील ऊर्जा, जल व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी संबंधित प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासही स्पष्ट नकार दिला आहे. गिलगिट-बाल्टिस्तान, खैबर-पख्तुनख्वा आणि पाकव्याप्त काश्मीरसह किनारपट्टी भागांत …

The post पाकमधील प्रकल्पाचा विस्तार चीनने रोखला appeared first on पुढारी.

Go to Source