गुरबाजने केली गरिबांची दिवाळी गोड

गुरबाजने केली गरिबांची दिवाळी गोड

अहमदाबाद, वृत्तसंस्था : भारतात सुरू असलेल्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने सर्वांना अचंबित करणारी कामगिरी करून दाखवली. उपांत्य फेरीच्या अगदी जवळ हा संघ पोहोचला होता. परंतु, दुर्दैवाने ते स्पर्धेतून बाहेर पडले; पण अफगाणिस्तानच्या खेळाडूने मायदेशी जाता जाता भारतीयांची मन जिंकणारी कृती केली. संघाचा स्टार खेळाडू रहमानउल्ला गुरबाज याने मध्यरात्री अहमदाबादच्या फुटपाथवर झोपलेल्या लोकांना गुपचूपपणे आर्थिक मदत करून त्याने त्यांची दिवाळी गोड केली.
कोलकाता नाईट रायडर्सने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये विश्वचषकाचा प्रवास संपल्यानंतर तो रात्री 3 वाजता अहमदाबादच्या रस्त्यावर पोहोचला आणि रस्त्याच्या कडेला झोपलेल्या लोकांजवळ शांतपणे पैसे ठेवून निघून गेला.
The post गुरबाजने केली गरिबांची दिवाळी गोड appeared first on पुढारी.

अहमदाबाद, वृत्तसंस्था : भारतात सुरू असलेल्या वन-डे वर्ल्डकप स्पर्धेत अफगाणिस्तान संघाने सर्वांना अचंबित करणारी कामगिरी करून दाखवली. उपांत्य फेरीच्या अगदी जवळ हा संघ पोहोचला होता. परंतु, दुर्दैवाने ते स्पर्धेतून बाहेर पडले; पण अफगाणिस्तानच्या खेळाडूने मायदेशी जाता जाता भारतीयांची मन जिंकणारी कृती केली. संघाचा स्टार खेळाडू रहमानउल्ला गुरबाज याने मध्यरात्री अहमदाबादच्या फुटपाथवर झोपलेल्या लोकांना गुपचूपपणे आर्थिक …

The post गुरबाजने केली गरिबांची दिवाळी गोड appeared first on पुढारी.

Go to Source