उत्तराखंडमध्ये बोगद्याचा स्लॅब कोसळून चाळीस मजूर अडकले

उत्तराखंडमध्ये बोगद्याचा स्लॅब कोसळून चाळीस मजूर अडकले

डेहराडून; वृत्तसंस्था : सिल्क्यारा ते दंडलगाव मार्गावरील काम सुरू असलेला बोगद्याचा भाग कोसळल्याने आत 40 हून अधिक मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोगद्यात 270 मीटर आतमध्ये वरील सुमारे 250 मीटरचा स्लॅबचा भाग अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली. एनडीआरएफ व एसडीआरएफ यांची पथके मदत व बचावकार्यात जुंपली आहेत.
चार धाम रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तराखंड ते यमुनोत्रीचे अंतर 26 कि.मी.ने कमी करणारा साडेचार कि.मी. अंतराचा हा बोगदा तयार करण्याचे काम सुरू होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास या बोगद्याचा 250 मीटरचा भाग अचानक कोसळला. त्यावेळी या बोगद्यात 40 हून अधिक मजूर काम करीत होते. घटनेची माहिती मिळताच उत्तर काशीचे पोलिस अधीक्षक अर्पण यदुवंशी तातडीने घटनास्थळी पोहोचले व प्रशासनालाही कामाला लावले. बोगद्याच्या तोंडाशी असलेले ढिगारे हटवण्याचे काम हाती घेण्यात आले असून एसडीआरएफ आणि पोलिस यांची पथके दिवसभर जीवाचे रान करून आत अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याची शिकस्त करीत होते.बोगद्याच्या तोंडापासून आतपर्यंत डोंगराचा भाग त्या स्लॅबवर कोसळला आहे. तो स्लॅब काढण्याचे कठीण काम सुरू करण्यात आले आहे. एचआयडीसीएल कंपनीकडे या टनेल निर्मितीचे काम देण्यात आले आहे.
ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यश
सकाळी 11च्या सुमारास मदत पथकाला स्लॅबच्या खालील एका फटीतून ऑक्सिजनचे पाईप आत ढकलण्यात यश आले असून त्या मदतीने आत अडकलेल्या मजुरांना प्राणवायू मिळत राहणार आहे.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
एसडीआरएफचे कमांडर मणिकांत मिश्रा म्हणाले की, एसडीआरएफची पथके सर्व साहित्य व उपकरणांसह बचावकार्यात जुंपली असून बाहेरच्या भागातील ढिगारे उपसून आत जाण्याचे व कोसळलेल्या स्लॅबचा भाग कापून काढण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी म्हणाले की, मी अधिकार्‍यांच्या सतत संपर्कात आहे. एनडीआरएफच्या पथकालाही एसडीआरएफच्या मदतीसाठी पाचारण करण्यात आले आहे. अडकलेल्या सर्वांना लवकरच बाहेर काढण्यात यश येईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.फ

The post उत्तराखंडमध्ये बोगद्याचा स्लॅब कोसळून चाळीस मजूर अडकले appeared first on पुढारी.

डेहराडून; वृत्तसंस्था : सिल्क्यारा ते दंडलगाव मार्गावरील काम सुरू असलेला बोगद्याचा भाग कोसळल्याने आत 40 हून अधिक मजूर अडकले आहेत. त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. बोगद्यात 270 मीटर आतमध्ये वरील सुमारे 250 मीटरचा स्लॅबचा भाग अचानक कोसळल्याने ही दुर्घटना घडली. एनडीआरएफ व एसडीआरएफ यांची पथके मदत व बचावकार्यात जुंपली आहेत. चार धाम रस्ता प्रकल्पांतर्गत …

The post उत्तराखंडमध्ये बोगद्याचा स्लॅब कोसळून चाळीस मजूर अडकले appeared first on पुढारी.

Go to Source