शिंदे गटाच्या कार्यक्रमात थिरकली गौतमी पाटील; सुषमा अंधारेंची टीका

शिंदे गटाच्या कार्यक्रमात थिरकली गौतमी पाटील; सुषमा अंधारेंची टीका

पुढारी ऑनलाईन डेस्क :  दिलखेच अदा आणि नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणारी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा आज (दि.११) ठाण्यात कार्यक्रम पार पडला. दिवाळी पहाटचे औचित्य साधून शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाण्यातील चिंतामणी चौकात हा कार्यक्रम पार पडला. गौतमीच्या या कार्यक्रमाला तरूणांनी तुफान गर्दी केल्याने हा कार्यक्रम चर्चेचा ठरला. मात्र या कार्यक्रमावर आक्षेप घेत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यानी सोशल मीडियाच्या माध्यमातून आज (दि.१२) शिंदे गटावर टीका केली आहे.
याबाबत आपल्या ‘X’ आकाऊंटवरून बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या, दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पं. बिस्मिल्ला साहेबांची सनई पं. भीमसेन जोशी यांचे भक्ती गीत किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा हे सगळं ऐकून होतो. पण ठाण्यामध्ये आज उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेबांनाच काय अवघ्या महाराष्ट्राला सुद्धा अपेक्षित नसेल
 
 
 
The post शिंदे गटाच्या कार्यक्रमात थिरकली गौतमी पाटील; सुषमा अंधारेंची टीका appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क :  दिलखेच अदा आणि नृत्यामुळे तरुणांना भुरळ घालणारी लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिचा आज (दि.११) ठाण्यात कार्यक्रम पार पडला. दिवाळी पहाटचे औचित्य साधून शिंदे गटाच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी गौतमीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ठाण्यातील चिंतामणी चौकात हा कार्यक्रम पार पडला. गौतमीच्या या कार्यक्रमाला तरूणांनी तुफान गर्दी केल्याने हा कार्यक्रम चर्चेचा …

The post शिंदे गटाच्या कार्यक्रमात थिरकली गौतमी पाटील; सुषमा अंधारेंची टीका appeared first on पुढारी.

Go to Source