नागपूर : राजू ढेंगरे हत्येप्रकरणी दोघा नोकरांना मध्यप्रदेशमध्ये अटक

नागपूर : राजू ढेंगरे हत्येप्रकरणी दोघा नोकरांना मध्यप्रदेशमध्ये अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  भाजपचे नागपूर ग्रामीणचे नेते, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊराव ढेंगरे (वय ४८) यांच्या दोन मारेकऱ्यांना मंगळवारी (दि.१४) मध्यप्रदेशमध्ये अटक करण्यात आली. ढेंगरे यांच्या ढाब्यावर काम करणाऱ्या दोन नोकरांनी दिवाळीसाठी गावी जाऊ दिले नाही, बोनस दिला नाही म्हणून रात्री पलंगावर झोपलेल्या राजू ढेंगरे यांची गळा दाबून व काठीने डोक्यावर वार करीत हत्या केली होती.
मध्यप्रदेशमधील मंडला येथील छोटू आणि आदी नामक या दोन नोकरांना कामावर ठेवताना कुठलीही ओळखीची कागदपत्रे न ठेवल्याने त्यांचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले.  दोन महिन्यांपूर्वी एका एजंटच्या माध्यमातून राजू ढेंगरे यांनी त्यांना कामावर ठेवले होते. उमरेड रोडवरील पाचगाव विहिरगाव परिसरात राजू डेंगरे यांचा ढाबा असून घटनेच्या रात्री जेवताना या तिघांचा वाद झाला होता. दिवाळी समोर असताना बोनस न देता गावी जाऊ न दिल्याने राग मनात धरून दोघा नोकरांनी त्यांची हत्या केली.
हेही वाचा :

Nashik crime news : घोटी येथे डोक्यात दगड घालून तरुणाचा खून; सख्ख्या भावांवर गुन्हा दाखल
ठाणे : रेल्वे मार्गावरून फरफट नेऊन प्रवासी महिलेवर अत्याचार; एकास अटक
सातारा : केटीएम गँगकडून १०३ तोळे सोने जप्त; ५ जणांना अटक

The post नागपूर : राजू ढेंगरे हत्येप्रकरणी दोघा नोकरांना मध्यप्रदेशमध्ये अटक appeared first on पुढारी.

नागपूर; पुढारी वृत्तसेवा :  भाजपचे नागपूर ग्रामीणचे नेते, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य राजू भाऊराव ढेंगरे (वय ४८) यांच्या दोन मारेकऱ्यांना मंगळवारी (दि.१४) मध्यप्रदेशमध्ये अटक करण्यात आली. ढेंगरे यांच्या ढाब्यावर काम करणाऱ्या दोन नोकरांनी दिवाळीसाठी गावी जाऊ दिले नाही, बोनस दिला नाही म्हणून रात्री पलंगावर झोपलेल्या राजू ढेंगरे यांची गळा दाबून व काठीने डोक्यावर वार करीत हत्या …

The post नागपूर : राजू ढेंगरे हत्येप्रकरणी दोघा नोकरांना मध्यप्रदेशमध्ये अटक appeared first on पुढारी.

Go to Source