कोल्हापूर : बिद्रीत ए वाय यांना आपल्या गोटात खेचण्याचे नामदार-खासदारांचे प्रयत्न!

कोल्हापूर : बिद्रीत ए वाय यांना आपल्या गोटात खेचण्याचे नामदार-खासदारांचे प्रयत्न!

गुडाळ; आशिष पाटील : बिद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज माघारीला अवघे दोन दिवस राहिलेले असताना राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही.
सत्तारूढ आघाडीचे नेते पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ आणि विरोधी आघाडीचे एक नेते खा. संजय मंडलिक हे दोघेही ए वाय आमच्याच आघाडी सोबत राहणार अशी ग्वाही देत असून ए. वाय. सांगा कोणाचे? असा प्रश्न बिद्री कार्यक्षेत्रात उपस्थित होत आहे. त्यामुळे ए वाय पाटील यांना नामदार आपल्या गोटात खेचणार की खासदार खेचणार याकडे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, बिद्री चे चेअरमन माजी आमदार के पी पाटील आणि त्यांचे दाजी राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील या मेव्हण्या -पाहुण्या नी एकत्र यावे यासाठी ना. हसन मुश्रीफ यांनी केलेले प्रयत्न अखेर फोल ठरल्याचे खात्रीलायक वृत्त असून ए. वाय. पाटील हे विरोधी आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
विरोधी आघाडीने दिलेली चेअरमन पदाची ऑफर ए वाय यांनी स्वीकारली असून दोनच दिवसात आपली नवी भूमिका ते कार्यकर्त्यां समोर मांडतील असे सांगण्यात येत आहे. ए वाय पाटील यांच्या भूमिकेमुळे बिद्री ची निवडणूक आता हाय व्होल्टेज होणार हे स्पष्ट झाले आहे.
ना. हसन मुश्रीफ, माजी मंत्री आ. सतेज पाटील, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार संजयबाबा घाटगे, आणि विद्यमान चेअरमन माजी आमदार के पी पाटील यांची सत्तारूढ आघाडी आणि विरोधात ना. चंद्रकांतदादा पाटील,खा. संजय मंडलीक, आ. प्रकाशराव आबिटकर, माजी आमदार अमल महाडिक,राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील,समरजितसिंह घाटगे यांची विरोधी आघाडी अशी लढत होण्याची शक्यता आहे.
The post कोल्हापूर : बिद्रीत ए वाय यांना आपल्या गोटात खेचण्याचे नामदार-खासदारांचे प्रयत्न! appeared first on पुढारी.

गुडाळ; आशिष पाटील : बिद्री साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या अर्ज माघारीला अवघे दोन दिवस राहिलेले असताना राष्ट्रवादी चे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी आपली भूमिका अद्यापही स्पष्ट केलेली नाही. सत्तारूढ आघाडीचे नेते पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ आणि विरोधी आघाडीचे एक नेते खा. संजय मंडलिक हे दोघेही ए वाय आमच्याच आघाडी सोबत राहणार अशी ग्वाही देत …

The post कोल्हापूर : बिद्रीत ए वाय यांना आपल्या गोटात खेचण्याचे नामदार-खासदारांचे प्रयत्न! appeared first on पुढारी.

Go to Source