चंद्राबाबू, नितीश कुमारांना राऊतांचा टाेला, “स्‍वत:ला संविधानाचे पुजारी…”

चंद्राबाबू, नितीश कुमारांना राऊतांचा टाेला, “स्‍वत:ला संविधानाचे पुजारी…”

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : भाजप प्रणित एनडीए सरकार सलग तिसर्‍यांदा सत्ता स्‍थापन करत आहे. यंदाच्‍या लाेकसभा निवडणुकीत  तेलगू देसम पार्टी ( टीडीपी)चे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू आणि जनता दल संयुक्‍त ( जेडीयू)चे प्रमुख नितीश कुमार यांचा पाठिंबा महत्त्‍वपूर्ण ठरला आहे. याच मुद्‍यावर आज (दि. ८) माध्‍यमाशी बाेलताना ठाकरे गटाचे खासदार संजय  राऊत यांनी दाेन्‍ही नेत्‍यांना टाेला लगावत एनडीए सरकारवर हल्‍लाबाेल केला.
चंद्राबाबू, नितीश कुमारांवर संविधान वाचवण्याची जबाबदारी
संजय राऊत म्‍हणाले की, “चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे स्वत:ला संविधानाचे पुजारी मानतात.  आता संविधान वाचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावरच आहे. स्वतःला सर्वात मोठे लोकशाहीवादी म्हणवणारे चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान आहे. आता त्यांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन होत असताना, संविधान, कायदा आणि लोकशाही वाचवण्याची सर्वात मोठी जबाबदारी त्यांच्यावर आहे.”

#WATCH | Shiv Sena (UBT) leader Sanjay Raut says, “… The biggest challenge are Chandrababu Naidu and Nitish Kumar who call themselves the biggest democrats. Now that the government is being formed with their support, the responsibility to save the constitution, law, and… pic.twitter.com/X7AyRxKotI
— ANI (@ANI) June 8, 2024

भाजपसोबत सीबीआय, ईडी आहे. या भाजपच्या शाखा आहेत. त्यामुळे प्रफुल्‍ल पटेल, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदेंची फाईली बंद होतील. तर विराेधीपक्षातील  लालूप्रसाद यादव यांच्यासह अनेक विरोधी पक्षांच्या फाईल्स उघडल्या जातील, असा आरोपही संजय राऊत यांनी केला आहे.
राहुल गांधी यांनी जे सांगायचं आहे ते सांगितले आहे. व्यापारी आणि राजकीय लोकांचा फायदा होण्यासाठी शेअर बाजारचा वापर केला जात आहे. गुजरातचे दोन व्यापारी देश चालवत आहेत. शेअर बाजाराशी त्यांचे जुने नाते आहे. हे पुढे देखील होत राहिल. देशाला लुटले जाईल, व्यापारांना फायदा मिळवून दिला जाईल, असा आराेपही त्‍यांनी केला.