जेजुरीत खंडोबा देवदर्शन घेवून निघालेल्या कारचा अपघात; पाच जण जखमी

जेजुरीत खंडोबा देवदर्शन घेवून निघालेल्या कारचा अपघात; पाच जण जखमी

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : जेजुरी-नीरा रस्त्यावर डिझेल टँकर व कार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील ५ जण गंभीर जखमी झाले.
मंगळवारी (दि.१४) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जेजुरी-निरा रस्त्यावर दौंडज खिंडीत भरधाव वेगाने जाणाऱ्या डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने कारला धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण बारामती तालुक्यातील पणदरे येथील असून ते जेजुरीला देवदर्शन घेवून गावी परत जात असताना हा अपघात झाला. यामध्ये नरेंद्र टेंगले, संदीप राशीनकर, सूरज कारंडे, गणेश टेंगले, राहुल टेंगले हे पाच जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. या अपघातात कारचे मोठे नुकसान झाले आहे. जेजुरी पोलीस या अपघात प्रकरणी तपास करीत आहेत.
The post जेजुरीत खंडोबा देवदर्शन घेवून निघालेल्या कारचा अपघात; पाच जण जखमी appeared first on पुढारी.

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : जेजुरी-नीरा रस्त्यावर डिझेल टँकर व कार यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील ५ जण गंभीर जखमी झाले. मंगळवारी (दि.१४) सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जेजुरी-निरा रस्त्यावर दौंडज खिंडीत भरधाव वेगाने जाणाऱ्या डिझेलची वाहतूक करणाऱ्या टँकरने कारला धडक दिली. या अपघातात कारमधील पाच जण बारामती तालुक्यातील पणदरे …

The post जेजुरीत खंडोबा देवदर्शन घेवून निघालेल्या कारचा अपघात; पाच जण जखमी appeared first on पुढारी.

Go to Source