पुणे : सिंहगड किल्ल्यावर वाहतूक कोंडी; पर्यटकांची वर्दळ वाढली

पुणे : सिंहगड किल्ल्यावर वाहतूक कोंडी; पर्यटकांची वर्दळ वाढली

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीची सुट्टी आणि त्यातच पाडवा असल्याने पर्यटक सिंहगडावर आनंद लुटण्यासाठी गेले मात्र कोंढणपूर, अवसरेवाडी फाटा ते सिंहगड दरम्यान वाहने उभी केल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली.
दिवाळीची सुट्टी असल्याने पुणे शहरासह जिल्ह्यातून अनेक पर्यटक सिंहगड पाहण्यासाठी आले होते. डोणजे व कोंढणपूर या दोन्ही भागातून वाहने मोठ्या प्रमाणावर येत होती. अवसरेवडी फाटा येथून सुमारे दोन किलोमीटरपर्यंत चारचाकी वाहनांनी आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क केली होती. त्यामुळे येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना अडचण निर्माण झाली होती.  यावेळी दुचाकीसह चारचाकी वाहने अडकून पडून मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याचा पर्यटकांना नाहक त्रास सहन करावा लागला. या दरम्यानच्या रस्त्यावर सुरक्षा रक्षक कमी असल्याने ही वाहतूक कोंडी झाली असल्याचे काही वाहन चालकांनी सांगितले.
हेही वाचा : 

जेजुरीत खंडोबा देवदर्शन घेवून निघालेल्या कारचा अपघात; पाच जण जखमी
Kolhapur News : गगनबावड्यात विमान कोसळल्याची अफवा अन् सगळं प्रशासन कामाला
Pune News : पैशावर निवडून येणारे गावचा विकास काय साधणार?

 

The post पुणे : सिंहगड किल्ल्यावर वाहतूक कोंडी; पर्यटकांची वर्दळ वाढली appeared first on पुढारी.

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीची सुट्टी आणि त्यातच पाडवा असल्याने पर्यटक सिंहगडावर आनंद लुटण्यासाठी गेले मात्र कोंढणपूर, अवसरेवाडी फाटा ते सिंहगड दरम्यान वाहने उभी केल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागून वाहतूक कोंडी झाली. दिवाळीची सुट्टी असल्याने पुणे शहरासह जिल्ह्यातून अनेक पर्यटक सिंहगड पाहण्यासाठी आले होते. डोणजे व कोंढणपूर या दोन्ही भागातून वाहने मोठ्या प्रमाणावर …

The post पुणे : सिंहगड किल्ल्यावर वाहतूक कोंडी; पर्यटकांची वर्दळ वाढली appeared first on पुढारी.

Go to Source