जो बायडेन यांनी पत्नी ‘जिल’सोबत असा साजरा केला ‘दिवाळी पाडवा’

जो बायडेन यांनी पत्नी ‘जिल’सोबत असा साजरा केला ‘दिवाळी पाडवा’


पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यूएस फर्स्ट लेडी, पत्नी ‘जिल’सोबत दिवाळीचा सण साजरा केला आहे. बायटडेन यांनी पत्नीसोबत दिवा पेटवतानाचा व्हाईट हाऊसमधील एक व्हिडिए शेअर केला आहे. या व्हिडिओ पोस्टसोबत त्यांनी ‘X’ सोशल मीडिया अकाऊंटवरून (पूर्वी ट्विटर) एक संदेश देखील शेअर केला आहे. (Joe Biden Diwali Celebration)
भारतामध्ये दिवाळी सणाची धामधुम सुरू आहे. दरम्यान अनेक भारतीय लोक हे परदेशात आहेत. अमेरिकेत देखील अनेक भारतीय नागरिक राहतात, ते अनेक भारतीय सण परदेशातच साजरे करतात. दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पत्नी जिल बायडेन सोबत व्हाईट हाऊसमध्ये दिवाळीनिमित्त दिवा उजळवला आहे. तसेच त्यांनी हा व्हिडिओ शेअर करत एक संदेश देखील दिला आहे. (Joe Biden Diwali Celebration)
दिवाळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर करत, बायडेन यांनी एक संदेश दिला आहे . यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, आज (दि.१४) मी आणि जिलने द्वेष आणि विभाजनाच्या अंधारावर बुद्धि, प्रेम आणि एकतेचा प्रकाश म्हणून दिवा उजळवला, असे म्हटले आहे. तसेच आपण या सुट्टीच्या आणि आपल्या राष्ट्राच्या चिरस्थायी भावनेचा स्वीकार करूया. तसेच आपल्या सामायिक प्रकाशाचे सामर्थ्य प्रतिबिंबित करूया, असेही म्हटले आहे. (Joe Biden Diwali Celebration)

Today, Jill and I lit the Diya to symbolize Diwali’s message of seeking the light of wisdom, love, and unity over the darkness of hate and division.
May we embrace the enduring spirit of this holiday and of our nation – and reflect on the strength of our shared light. pic.twitter.com/eHjfQ68rXU
— President Biden (@POTUS) November 14, 2023

हेही वाचा:

म्यानमारमध्‍ये लष्‍कराचा हवाई हल्‍ला, दोन हजारांहून अधिक लाेक भारतात आश्रयाला
PRS Oberoi Passes Away: ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे प्रमुख पीआरएस ओबेरॉय यांचे निधन
Pune News : अजित पवारांची गोविंदबागेकडे पाठ; पदाधिकाऱ्यांचा शरद पवारांवर शुभेच्छांचा वर्षाव

The post जो बायडेन यांनी पत्नी ‘जिल’सोबत असा साजरा केला ‘दिवाळी पाडवा’ appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यूएस फर्स्ट लेडी, पत्नी ‘जिल’सोबत दिवाळीचा सण साजरा केला आहे. बायटडेन यांनी पत्नीसोबत दिवा पेटवतानाचा व्हाईट हाऊसमधील एक व्हिडिए शेअर केला आहे. या व्हिडिओ पोस्टसोबत त्यांनी ‘X’ सोशल मीडिया अकाऊंटवरून (पूर्वी ट्विटर) एक संदेश देखील शेअर केला आहे. (Joe Biden Diwali Celebration) भारतामध्ये दिवाळी सणाची धामधुम सुरू …

The post जो बायडेन यांनी पत्नी ‘जिल’सोबत असा साजरा केला ‘दिवाळी पाडवा’ appeared first on पुढारी.

Go to Source